आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नाला यश
महादेव विहीर पुनर्विकास व छ. शिवाजी महाराज पुतळा आवार सुशोभीकरण कामांसाठी २ कोटी ५५ लाख निधी मंजूर
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा शहरातील नगर परिषदेच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजना जिल्हास्तर अंतर्गत मंगळवेढा शहरातील ऐतिहासिक महादेव विहीर पुनर्विकास व सुशोभीकरण विकास कामांसाठी १ कोटी ८० लाख तसेच संतनगरीमध्ये साकार होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आवारातील नगरपालिका मालकीच्या गट नं.२६ जागेस कंपाउंड करणे व सुशोभीकरण या विकास कामांसाठी जिल्हाधिकारी सोलापूर, नगर विकास शाखा अंतर्गत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या आमदार निधी कोट्यातून ७५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
शिवकालीन कालखंडाचा खूप मोठा वारसा असणाऱ्या महादेव विहिरीच्या कडावर ब्रह्मदेवाची मूर्ती असून त्या मूर्तीच्या पाठीमागे मंगळवेढा संतभूमी चा खूप मोठा अध्यात्मिक इतिहास आहे. अतिशय दुर्मिळ ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या या विहिरीच्या विकास व सुशोभीकरणासाठी मंगळवेढा तालुका सजग नागरिक संघाने आ आवताडे यांच्याकडे निधीची मागणी केली असता आमदार आवताडे यांनी त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन यासाठी मोठा निधी मंजूर पदरात पाडून घेतल्याने या विहिरीचे रुपडे बदलण्यास खूप मोठे सहकार्य लाभणार आहे. तसेच
शहर व तालुक्यातील नागरिक व शिवभक्तांनी नियोजित विकास कामांसाठी निधीसाठी आमदार यांना दोन दिवसांपूर्वी निवेदन पत्र दिले होते. नागरिकांच्या सदर मागणीची प्राधान्यता लक्षात घेऊन व शहराचे वैभव आणखी वाढवण्यासाठी आ आवताडे यांनी या निधीसाठी कसोशीने प्रयत्न करून शहरवासीयांच्या विकासाची मोठी अपेक्षा पूर्ण केली आहे. शिवभक्तांच्या शिवनिष्ठेची कदर जाणून शिवरायांच्या राजकीय नेतृत्वाची प्रेरणा माझ्या लोकप्रतिनिधीत्वाशी बांधील ठेवून या निधीसाठी आपण अग्रक्रमाने प्रयत्नशील राहू असा शब्द आमदार आ आवताडे यांनी त्यावेळी शब्द दिला होता. त्या शब्दाला जागत आ आवताडे यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाल्याने शिवभक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर प्रसंगी माजी प्राचार्य प्रा.येताळा भगत सर, कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा लेबर फेडरेशन संचालक सरोजभाई काझी, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी उपगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, माजी नगरसेवक कैलास कोळी, पांडुरंग नाईकवाडी कोळी, दत्तात्रय भोसले, राहुल सावंजी, माजी अध्यक्ष चंद्रशेखर कौंडूभैरी, विठ्ठल गायकवाड, शिवाजी वाकडे, दादासाहेब ओमणे, फिरोज मुलाणी, जनार्धन डोरले, अशोक लेंडवे, ज्ञानेश्वर कौंडूभैरी, दिगंबर यादव, परमेश्वर पाटील, राहुल वाकडे, आनंद मुढे, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश सावंजी, प्रा.विनायक कलुबर्मे, वारी परिवाराचे सतिश दत्तु, माजी अध्यक्ष अनिल मुदगुल, अतुल मुरडे, चंद्रकांत काकडे, आदित्य मुदगुल आदी मान्यवर व शिवभक्त उपस्थित होते.

