Take a fresh look at your lifestyle.

निष्ठेचे फळ…सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी रामेश्वर मासाळ

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते दिले नियुक्तीचे पत्र

498

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

        सोलापूर जिल्हा(ग्रामीण)राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट)कार्याध्यक्ष पदी गोणेवाडी येथील रामेश्वर मासाळ यांची निवड केली असून त्यांच्या निवडीचे पत्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते सोलापूर येथे देण्यात आले.

         रामेश्वर मासाळ हे गोणेवाडी चे लोकनियुक्त माजी सरपंच असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते असून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. पक्ष सत्तेत नसताना त्यांनी पक्ष वाढीसाठी केलेले प्रयत्न तसेच पक्षावरील असणारी निष्ठा यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. कार्याध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक असताना अजितदादा पवार यांनी रामेश्वर मासाळ यांच्या ही जबाबदारी टाकून मोठी संधी दिली आहे.सोलापूर येथील पक्षाच्या बैठकीत रामेश्वर मासाळ यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, प्रदेश सरचिटणीस लतिफ भाई तांबोळी,तालुकाध्यक्ष भारत बेदरे,विधानसभा मतदार संघ अध्यक्ष अजित जगताप आदी उपस्थित होते. निवडीनंतर मासाळ म्हणाले मुख्यमंत्री अजित दादा पवार व  प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी टाकलेली जबाबदारी विश्वासाने व प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष वाढीसाठी नेटाने प्रयत्न करणार असून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस  अव्वल ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More