Take a fresh look at your lifestyle.

आंधळगाव परिसरात जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा

9 लाख 12 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त,चौघा विरुध्द गुन्हा दाखल

1,385

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

आंधळगाव येथे 52 पानाच्या जुगारावर पैशाची पैज लावून खेळत असताना जुगार अड्ड्यावर पोलीसांनी छापा टाकून 9 लाख 12 हजार 300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन निलेश सिताराम लेंडवे,अमर बाळासो जाधव (आंधळगाव), नवनाथ मुरलीधर खटकाळे (अकोला),विठ्ठल तुकाराम लाड (घोडेश्वर) या चौघावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

          पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, आंधळगाव ते लक्ष्मी दहिवडी कडे जाणारे रोडवर नेचर डेअरीच्या बाजूस पत्रा शेडच्या आडोशाला दि.23 रोजी सायंकाळी 5.30 वाजता काही लोक 52 पानाच्या जुगारावर पैशाची पैज लावून खेळत असल्याची गोपनीय माहिती पो.नि.रणजीत माने यांना मिळताच त्यांनी पोलीसांच्या मदतीने सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी 12 हजार 300 रोख रक्कम,8 लाख किंमतीची स्कॉर्पीयो गाडी,75 हजार रुपयाची हिरो कंपनीची स्प्लेंडर गाडी,25 हजार रुपये किंमतीची डिलक्स मोटर सायकल असा एकूण 9 लाख 12 हजार 300 रुपयाचा मुद्देमाल पोलीसांना मिळून आला. याची फिर्याद पोलीस अंमलदार प्रमोद साळुंखे यांनी दिल्यावर वरील चौघा आरोपीवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुर्यकांत धापटे हे करीत आहेत.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More