Take a fresh look at your lifestyle.

लिफ्ट मागितल्याचा गैरफायदा घेत हैवानाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार,

पोलिसांकडून आरोपीस अटक

886

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

ग्रामीण भागातून मगळवेढा येथे जाण्यासाठी अल्पवयीन मुलीला बस न मिळाल्याने एका मोटर सायकलस्वारास लिफ्ट मागितलीअसता याचा गैरफायदा घेत तीला ज्वारीच्या पिकामधे नेवून अत्याचार केल्याप्रकरणी लिफ्ट देणारा राजू चंद्रकांत राठोड (रा. बालाजीनगर) याला पोलिसांनी अटक करून पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

 

         पोलिस सुत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी, यातील अल्पवयीन पिडीत मुलगी ही दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वा. शिकवणीसाठी मंगळवेढा शहरात येत असताना बराच वेळ थांबूनही बस न आल्याने सांगोल्याकडून यातील अनोळखी आरोपी राजू राठोड हा मंगळवेढा शहराकडे मोटर सायकलवर येत असताना सदर पिडीत मुलीने तास चुकेल या भितीने त्याला मुलगी मोटरला लिफ्ट मागितली व त्या सायकलवर बसली असता आरोपीने शहरात नेण्याऐवजी बोराळे रोडवरील काळया शिवारात नेवून तीच्यावर जबरी अत्याचार करून पुन्हा त्या मुलीला शहरात शाळेजवळ आणून सोडले. सदर मुलीने ही घटना तीच्या शिक्षिकेला सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फूटली.

        मुलीला ज्या मोटर सायकलवरून नेले त्या मोटर सायकलवर पुढील बाजूस पोलिस व पाठीमागील नंबर प्लेटवर आई असे होते.त्यामूळे हा प्रकार पोलिसांकडून झाल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली.त्यामूळे अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव, वेळापूरच्या महिला डी. वाय.एस.पी, सोलापूरचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक या घटनेचा शोध घेण्यासाठी तत्काळ मंगळवेढयात दाखल झाले. पहाटेपर्यंत त्या आरोपीचा खबऱ्यामार्फत शोध घेतल्यानंतर या घटनेतील आरोपी बालाजीनगर येथील एक मजुर काम करणारा राजू राठोड असल्याची माहिती उघड झाली. या शोधासाठी सी.सी.टी वी च्या आधारे संशयीत आरोपीला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आरोपीच्या शोधासाठी विविध चार पथके तैनात करण्यात आली होती.

         या पथकाने पहाटे ४.०० वा. आरोपीला ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास महिला पोलिस उपनिरिक्षक मनिषा महाडिक या करीत आहेत. गुन्हयात वापरलेली मोटर सायकल अदयाप ताब्यात घेतलेली नसल्याचे सांगण्यात आले. आरोपी हा मजूर काम करत असताना पोलिस लिहिलेली गाडी त्याच्याकडे कशी काय आली याबाबत अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करीत असून याच्या मूळाशी जावून सत्य प्रकार उघड व्हावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More