Take a fresh look at your lifestyle.

येत्या काही दिवसात दामाजीचा 100कोटीचा डिस्टलरी प्रोजेक्ट उभा करणार – चेअरमन शिवानंद पाटील

दामाजी कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

807

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

      कर्जाचा बोजा असताना दामाजी ला कोणताही प्रकल्प नसताना पारदर्शी व काटकसरीने कारभार करीत सभासद व कामगारांची बँकांची देणी देवून गत हंगाम गाळप यशस्वी केला.भविष्यात सभासदांना जास्त दर देण्याच्या दृष्टीने 100 के एल पी डी डीस्टलरी प्रकल्प उभा करण्यासाठी दिल्ली येथे प्रस्ताव दिला असून त्यादृष्टीने तांत्रिक पूर्तता सुरू आहे.येत्या काही दिवसात दामाजीचा 100कोटीचा डिस्टलरी प्रोजेक्ट उभा केला जाईल व ऊसदराच्या बाबतीत इतर कारखान्याच्या पुढे दामाजी राहील अशी माहिती चेअरमन शिवानंद पाटील यानी दिली.

      श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि 24 रोजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांचे अध्यक्षतेखाली कारखानास्थळावर संपन्न झाली.  

       यावेळी पाटील पुढे म्हणाले, कारखाना उभारणी करताना कै कि रा मर्दा, रतनचंद शहा,चरणू काका पाटील यांच्यासह अनेकांनी कष्टांनी अनेक अडचणी सोसत कारखाना उभा केला व चांगला चालवला तसेच त्यापुढील पदाधिकाऱ्यांनी देखील कारखाना आपल्या पद्धतीने चालवला.15-16 मधे चेअरमन बुगडे यांनी सत्ता सोडताना केवळ 39कोटी कर्ज होते परंतु सत्तेवर आलेल्यांनी 145कोटी कर्ज असल्याचे सांगितले. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत कारखान्यावर 200कोटीचा कर्जाचा बोजा असताना प्रशांत परिचारक,प्रा शिवाजीराव कालुंगे, रामकृष्ण नागणे,राहुल शहा यांच्या मदतीने हंगाम यशस्वी केला.कारखाना चालवताना काही कठोर निर्णय घेतले.सभासद, कामगार,बँका यांच्या मदतीने येणारा गाळप देखील चांगल्या पद्धतीने पार पाडणार असून भविष्यात उपपदार्थ निर्मिती साठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच कारखान्याची आर्थिक परिस्थती सुधारल्यावर कमी किंमतीत साखर दिली जाईल, सभासदांचा विमा उतरवला जाणार आहे. खुले सभासद, चांगली साखर देण्याचे धोरण राबविण्यात आले आहे. भविष्यात देखील शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक परिस्थिती लक्षात घेता कोजन केले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

       यावेळी प्रा शिवाजीराव काळूंगे यांनी कारखाना व्यवस्थापनाचे कौतुक करीत ऊस अडचण लक्षात घेता दामाजीला ऊस घालावा तसेच उजनी कालव्यातून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

       अहवाल वाचन प्रभारी कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी केले.यावेळी सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना चेअरमन पाटील यांनी उत्तरे दिली. यावेळीअड नंदकुमार पवार यांनी विद्यमान संचालकांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला तो सर्वानुमते संमत करण्यात आला.यावेळी विष्णुपंत आवताडे यांनी कमी दरात साखर देण्याची मागणी केली.

        यावेळी व्हा चेअरमन तानाजी खरात, शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा,  बाजार समितीचे माजी चेअरमन विष्णुपंत आवताडे, संचालक सिध्देश्वर आवताडे , यादप्पा माळी,रामचंद्र वाकडे, मारुती वाकडे, शिवाजीराव पवार, रामेश्वर मासाल,भारत पाटील,किसन सावंजी,कल्याण रोकडे, विजय बुरकुल,राजेंद्र सुरवसे, अड. देशमुख,  यांच्यासह संचालक मुरलीधर दत्तु, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणु पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी काबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर अशोक केदार, यांचेसह सुनील डोके,  सरपंच जमीर सुतार,अरुण किल्लेदार, चंद्रशेखर कोंदुभैरी, अड.राहुल घुले शिवानंद पाटील,पप्पू स्वामी, सिध्देश्वर हेंबाडे, काशिनाथ पाटील,महादेव माळी,  कार्यालयीन अधीक्षक दगडु फटे, कारखान्याचे चिफ इंजिनिअर परमेश्वर आसबे, मुख्य शेती अधिकारी कृष्णात ठवरे, चिफ अकौंटंट रमेश गणेशकर, प्रभारी लेबर आफिसर आप्पासाो शिनगारे, असि स्टोअरकिपर उत्तम भुसे, प्रभारी सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे,पर्चेस आफिसर संदिप इंगोले, केनयार्ड सुपरवायझर प्रकाश पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, कामगार पतसंस्थेचे चेअरमन विश्वास सावंजी,कारखान्यातील कामगार, सभासद, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी केले.

 

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More