दहा वर्षे संचालक असलेल्या भाकरे साहेबांना कारखान्याचा वार्षिक अहवाल समजत नसेल तर तज्ञ लेखापरीक्षकाकडून अहवाल समजून घ्यावा– संचालक दिगंबर भाकरे
मंगळवेढा प्रतिनिधी
दहा वर्षे संचालक व डीसीसी बँकेचे अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या भाकरे साहेबांना कारखान्याचा वार्षिक अहवाल समजत नसेल त्यानी तज्ञ लेखापरीक्षकाकडून अहवाल समजून घ्यावा.जर आपल्याला वरील माहिती खोटी वाटत असेल तर आपण आपल्या कारखान्यावरती येवून समोरासमोर चर्चा करावी आपण दिलेली माहिती अपूर्ण व चुकीची असून तालुक्यातील ४० हजार सभासदाची फसवणूक व दिशाभूल करणारी असल्याचा टोमणा दामाजीचे विद्यमान संचालक दिगंबर भाकरे यांनी मारला आहे.
ते पुढे म्हणाले,कारखाना निवडणुका काळात तुम्ही केलेल्या 198 कोटीच्या कर्जाचा डोंगर योग्य माहितीच्या आधारे मांडला होता. आपल्या पाठीमागच्या ५ वर्षाच्या कार्यकालाचा अहवाल समजून घेत असताना 31मार्च2022 या आपल्या कार्यकाळातील आकडेवारी नमूद आहे. आपण ती आकडेवारी अभ्यासपूर्ण व डोळे उघडे ठेवून पाहून घ्यावी .आपल्या काळात ज्या बँकेकडून जी कर्जे आपण घेतली त्या कर्जावरील व्याजाची तरतूद आपण कुठेही केली नाही.तसेच कर्जाची असणारी आकडेवारी स्पष्टपणे अहवालामध्ये पुढीलप्रमाणे मांडली असून ती तुम्ही पहावी.परिशिष्ट ४ :- ३१.०३.२०२२ अखेर ३८ कोटी ७७ लाख,परिशिष्ट ५ :- १ कोटी १९ लाख,परिशिष्ट ६ :- २ कोटी ६२ लाख,परिशिष्ट ७ :- ३ कोटी २५ लाख,परिशिष्ट ८ :- ११२ कोटी ८३ लाख तसेच ३१.०३.२०२२ नंतरचे आपल्या कार्यकाळातील बँक व इतर अॅडव्हांस खालीलप्रमाणे यशोदा पतसंस्था:- ३ कोटी २३ लाख,मोलेसेस :-११ कोटी,
साखर विक्री अॅडव्हांस :- ५ कोटी ५० लाख. इतके असून १७८ कोटी ३९ लाख मुद्दल व आपण आपल्या ५ वर्षाच्या कार्यकाळात या कर्जाच्या रकमेवरील व्याज तरतूद केलेली नाही या रकमेची व्याजाची रक्कम काढली असता जवळपास ४० कोटी रु रक्कम व्याज देणे शिल्लक आहे. याचा हि अभ्यास आपण तज्ञ लेखा परीक्षकाकडून अवगत करून घ्यावे तसेच खाजगी व्यापाऱ्याकडून वार्षिक ३६ %व्याज दराने एकूण १६ कोटी ५० लाख रु कोणी आणि कशासाठी इतक्या व्याजदराने घेण्यात आले. याचा खुलासा माजी संचालक व कारखान्याचे हितचिंतक म्हणून आपणास माहित नसेल तर माहिती करून आपण खुलासा करावा.
दामाजीवरती केलेल्या आरोपांचा फाटलेला बुरखा व कर्जाचा धूर वरीलप्रमाणे असून तो समजून घ्यावा.तसेच माझ्या सारख्याला विद्यमान संचालक म्हणून असे वाटते कि आपण एका नामवंत जिल्हा बँकेत अधिकारी म्हणून कामकाज केले असल्याने अशा प्रकारचे वार्षिक अहवालातील बाबी न समजणे इतपत अडाणी सारखे बोलून सभासदाचे रोष ओढवून घेऊ नये असा सल्ला देखील दिगंबर भाकरे यांनी दिला.

