पुणे (संतोष शिंदे)
जगातल्या सोशल मिडीयाच्या आभासी सर्वपक्षीय मित्रांची प्रत्यक्ष गळाभेट घडवून आणनाऱ्या पार्टी ट्रस्ट मित्र मेळाव्याचा मान यावर्षी सोलापूर जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. ही सोशल मित्रपरिवाराची जत्रा म्हणजे सामाजिक, राजकीय व उद्योजकतेतील भूमिकांची वैचारीक मेजवाणी असणार आहे.
1ऑक्टोबर 2023 रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रामकृष्ण गार्डन व्हीला येथे सकाळी 10 ते सायं 5या वेळेत मित्रांचा गोतावळा एकत्र येणार आहे.आपापल्या क्षेत्रात काम करत असतांना केवळ सोशल मिडीयावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असणारे केवळ फेसबुक, ट्रिटर, इन्स्टापुरतेच मर्यादीत असतात. त्यांची विचारसरणी, बोलीभाषा त्यांचे कलागुण याची घालमेल प्रत्यक्षात व्हावी, नवनवीन मित्रांची प्रत्यक्ष गळाभेट व्हावी. सततच्या व्यस्ततेतून बाहेर निघून निरनिराळ्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेत मनोरंजनाच्या दुनियेत मनमौजी व्हावे हा उदात्त हेतू या मित्रांच्या जत्रेचा आहे.यावर्षीच्या कार्यक्रमात सोलापूर लेझीम, लावणी नृत्य, एकपात्री विनोद अशा सांस्कृतीक कार्यक्रमासोबतच खान्देशातील मानदेशी खाद्यभोजनाची मेजवाणी असणार आहे.
सकाळच्या सत्रात पार्टी ट्रस्ट ला मदत करणाऱ्या सत्कारमूर्तीचा सत्कार केला जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर विविध सांस्कृतीक, वैचारीक व मनोरंजनपर योजले आहेत. पार्टी ट्रस्टने यंदा ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था केली आहे. ज्या मित्रांना नोंदणी करावयाची आहे, त्यांनी संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन पार्टी ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सांगोला येथील ट्रस्ट चे पदाधिकारी प्रदिप मिसाळ, राजू शिंदे, मल्हारराव गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.
*पार्टी ट्रस्ट मित्रमेळाव्यातील व्हेज मेनू जाहीर*
पार्टी ट्रस्ट मित्रमेळावा २०२३ साठीचे व्हेज मेनू जाहीर झाले असून त्याची घोषणा करण्यात आली आहे. पार्टी ट्रस्टचे प्रतिनिधी संग्राम देशमुख यांनी सांगितले की, ‘मागच्या सात वर्षापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही पार्टी ट्रस्ट मित्रमेळाव्याचे आयोजन करत असून आतापर्यंत नगर, पुणे, बारामती, लातूर, इत्यादि विविध ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला आहे. यंदा सांगोला जि.सोलापूर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील खाद्यसंस्कृतीची ओळख व्हावी, तिचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने वेगवेगळ्या भागातील शाकाहारी व मांसाहारी स्थानिक खाद्य पदार्थ केले जातात. त्यासाठीच संबंधित भागातीलच धान्य, भाजीपाला, घरगुती मसाले, मटणासाठी आवश्यक असणारे बोकड, मासे, इत्यादि गोष्टी घेण्यात येतात.
या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांना जेवणामध्ये सोलापुरी पद्धतीचे पदार्थ चाखायला मिळणार आहेत. व्हेज जेवणामध्ये करकंब बाजार आमटी, सांगोला मुगडाळ हलवा, दही, शेंगा चटणी कडक भाकरी, चपाती मसाला, बिर्याणी भात इत्यादि पदार्थ असणार आहेत. कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांनी https://bit.ly/Partytrust या लिंकवर जाऊन आपली नावनोंदणी करावी. कार्यक्रमासाठी नाममात्र २०० रुपये प्रवेश फी आकारण्यात येणार आहे. नावनोंदणी लिंक https://bit.ly/Partytrust . # येतायनाबे

