Take a fresh look at your lifestyle.

समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा येथील लकी ड्रॉ चे प्रथम बक्षिस मोटार सायकल चे मानकरी ठरले नंदेश्वर चे आप्पा सुखदेव गोरे 

195

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांच्या समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा येथे भव्य लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता.  येथील लकी ड्रॉ चे प्रथम बक्षिस मोटार सायकल चे मानकरी नंदेश्वर चे आप्पा सुखदेव गोरे  हे ठरले आहेत.

   शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी मंगळवेढा येथील समृद्धी ट्रॅक्टर, शोरूम येथे हा लकी ड्रॉ घेण्यात आला असून या लकी ड्रॉ मध्ये प्रथम बक्षिसाचे मानकरी म्हणून नंदेश्वर ता.मंगळवेढा येथीलआप्पा सुखदेव गोरे यांना पहिले पारितोषिक देण्यात आले. तर दुसरे हुलजंती येथील लक्ष्मण रायाप्पा माळी यांना एलईडी टीव्ही देण्यात आला तर तिसरे खूपसंगी येथील सुजाता शेजाळ यांना आटा चक्की धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले..

   प्रत्येकी दहा ग्राहकांमध्ये हा लकी ड्रॉ घेण्यात आला असून या लकी ड्रॉ मध्ये प्रथम बक्षीस म्हणून मोटर सायकल तर दुसरे बक्षीस म्हणून एलईडी टीव्ही तर तिसरे आटाचक्की व इतर सात ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट देण्यात आले असल्याचे जाहीर केले होते..

   यावेळी सोनालीका कंपनी चे एरिया मॅनेजर सुबोध शर्मा, ओंकार कोळी, शुभम माळी तसेच समृद्धी ट्रॅक्टरचे मॅनेजर सोमनाथ केसकर तसेच मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते.

   गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून समृद्धी ट्रॅक्टर काम करत आहे. शेतकरी ग्राहकांना नवनवीन योजना देत शेतकरी राजा सुखी समृद्धीमय व्हावा त्यामधून शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचवावे हाच प्रामाणिक प्रयत्न आहे. तरी सदर लकी ड्रॉ योजना ३०सप्टेंबर २०२३पर्यंत वाढीव करण्यात आली आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान अमर पाटील यांनी सर्व शेतकर्‍यांना केले.

-अमर पाटील(कार्यकारी संचालक)

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More