मंगळवेढा प्रतिनिधी
लक्ष्मी दहिवडी चे सुपुत्र व जिल्हा परिषद बांधकाम विभाग मंगळवेढा येथील प्रभारी उपअभियंता नंदकुमार कोष्टी यांना सोलापूर जिल्हा परिषदेचा 22-23 चा ‘आदर्श अभियंता पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
सदर पुरस्काराचे वितरण अभियंता दिनी म्हणजे 15 सप्टेंबर 2023 रोजी सोलापूर येथील यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद सोलापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, कार्यकारी अभियंता बांधकाम श्री. खराडे, कुलकर्णी साहेब यांच्या प्रमुख उपस्थित प्रदान करण्यात येणार आहे.
नंदकुमार कोष्टी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.त्यांची जिल्हा परिषदेकडे 33वर्षे सेवा झाली असून त्यांनी केलेल्या योग्य कामाची पावती त्यांना पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली आहे.

