घरजागा नोंदीच्या संदर्भात सुनावणी घेण्यास गटविकास अधिकारयाकडून टाळाटाळ
15ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी शेलेवाडी येथील वैशाली माने करणार उपोषण
मंगळवेढा प्रतिनिधी
शेलेवाडी येथील वैशाली दिनकर माने यांच्या घरजागेच्या संदर्भात
गटविकास अधिकारी पंचायत समिती मंगळवेढा यांच्याकडून दाखल तक्रारीवर वारंवार मागणी करून सुध्दा सुनावणीस टाळाटाळ करत असल्याने सुनावणी या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी पंचायत समिती मंगळवेढा येथे उपोषण करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी दिले आहे.
याबाबत दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की वैशाली दिनकर माने ह्या शेलेवाडी, ता. मंगळवेढा येथील रहिवासी असून त्यांचे नांवे शेलेवाडी ग्रामपंचायत मालमता क्र. १५३ ही घरजागा आहे. सदरची घरजागा सन २०२२ मध्ये शामराव देवबा पाटील यांचेकडून रजिस्टर खरेदी खताने खरेदी केलेली आहे.सदर जागेची नोंद माझ्या नांवे झाली असून सदर जागेच्या सिटीसव्र्व्हे (नं. १०६) वर सुध्दा माने यांचे नांव दाखल झाले आहे. सदर ठिकाणी त्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले असून त्याचा रक्कम रु 15हजाराचा पहिला हप्ता सुध्दा मिळालेला आहे. असे असताना या जागेच्या नोंदीविरोधात मी मागासवर्गीय विधवा महिला असल्या कारणाने जातीय मानसिकेतून मारुती देवबा पाटील यांनी तक्रार सादर केली आहे.
सदर तक्रारीच्या चौकशीमध्ये मुळ मालक शामराव देवबा पाटील यांनी सदर जागा मला खुष खरेदी दिली आहे असा जबाब दिला आहे. असे असताना सुध्दा मंगळवेढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे सदर बाबत सुनावणी घेत नाही, माझ्या विरुध्द आलेल्या तक्रारीची चौकशी करीत नाहीत, माझ्या जागेतील घरकुलास पुढील हप्ता सुध्दा देत नाही. या सर्व गोष्टींना गेली आठ महिने उलटले परंतु माझे घरकुल बांधकाम आहे तसे पडून आहे, ते पुर्णत्वास गेले नाही.तरी या गोष्टीचा विचार करून माझ्या विरुध्दच्या तक्रारीची चौकशी व सुनावणी पूर्ण करून मला माझ्या घरकुल हप्त्याची पुढील रक्कम मिळावी तसेच सदर तक्रारीची सुनावणी घेवून घरकुलाचे पुढील हप्त्याची रक्कम मिळण्यासाठी दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनी गटविकास अधिकारी पंचायत समिती मंगळवेढा यांचे कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे लेखी निवेदनाद्वारे माने सांगितले आहे.
या निवेदनाच्या प्रती
मुख्य कार्यकारी अधिकारी,तहसिलदार गटविकास अधिकारी,पोलीस निरीक्षक मंगळवेढा यांना दिल्या आहेत.
कोट-
येत्या पंधरा दिवसात याप्रकरणी सुनावणी पूर्ण करून निकाल दिला जाईल.या प्रकरणाची सुनावणी सुरू कागदपत्रे तपासणीचे काम सुरू असून त्यांना पुढील सुनावणीची तारीख दिली आहे.त्यामुळे त्यानी उपोषणाचा मार्ग अवलंबला जाऊ नये.
-श्री पाटील, गटविकास अधिकारी मंगळवेढा

