बठाण येथे बेकायदेशिर वाळूची कारवाई न करण्यासाठी लाच घेताना ग्रामपंचायत कर्मचारी व तलाठी लाचलुचपत च्या जाळ्यात
मंगळवेढा प्रतिनिधी
बठाण येथे घर बांधकामासाठी भीमा नदीतून बेकायदेशीर वाळु काढल्यामुळे वाळुची चोरीची कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडून पाच हजार रुपये लाच स्वीकारताना येथील कर्मचारी श्रीमंत मसाजी भालेराव (वय ५०) बठाण येथील अतिरिक्त सजा असलेले मुढवी येथील तलाठी गजानन शंकरराव चाफेकर (वय ३२ )यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, यातील बठान येथील तक्रारदार यांचे घराचे बांधकाम चालु असुन त्यानी बांधकामासाठी वाळु कमी पडल्याने बठाण हद्दीतुन जाणान्या
भीमा नदीतून वाळू काढल्यामुळे तक्रारदार यांच्यावर वाळुची कारवाई न करण्यासाठी म्हणुन ५ हजार रुपये लाचेची मागणी केली करण्यात आली होती याबाबतची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती त्यानुसार केलेल्या पडताळणीमध्ये यातीलआरोपी लोकसेवक क्रं.1 व 2 यांनी कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी करत ते स्विकारण्याचे मान्य केले होते
आज दि.17 जुलै रोजी लाचलुचपत विभागाने सापळा रचून आरोपी लोकसेवक क्र.1 यांनी लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक एसीबी सोलापूर गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार प्रमोद पकाले, पो ना संतोष नरोटे, पोकों गजानन किणगी, राहुल गायकवाड यांनी पार पाडली आहे.
दरम्यान गेल्या चार महिन्यापूर्वी येथील प्रांत कार्यालयातील तलाठी नळे याने महामार्ग बाधित शेतकऱ्याचे भरपाई काढण्यासाठी रक्कम स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका खाजगी इसमासह नळे याच्यावर कारवाई केली होती ही घटना ताजी असताना वाळूवरील कारवाई करू नये यासाठी अतिरिक्त पदभार असलेल्या तलाठी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी लाज स्वीकारल्याने येथील महसूल विभागातील कारभार चव्हाट्यावर आला आहे

