Take a fresh look at your lifestyle.

महावितरणकडून ‘एक गाव एक दिवस’ मोहीम राबविण्यास सिद्धेवाडी पासून सुरुवात

आ. समाधान आवताडे यांच्या गावभेट दौऱ्यातील सूचनेची महावितरण कडून दखल

902

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
       गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात आ समाधान आवताडे यांनी गाव भेट दौऱ्यात वीज ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यासंदर्भात महावितरण ला एक गाव एक दिवस मोहीम राबवून अडचणी सोडवण्याच्या सूचना दिल्या होत्या.महावितरण कडून तत्काळ दखल घेत सिद्धेवाडी ता. पंढरपूर येथे ‘एक गाव एक दिवस’ ही मोहीम राबविण्यात आली. व या दिवशी येथील बारा ठिकाणी विविध कामे करण्यात आली.

             पंढरपूर विधानसभा मतदारसंघातआ. समाधान आवताडे यांच्याकडून नागरिकांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यासंदर्भात गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या गाव भेट दौऱ्यात शेतीपंपाचे व घरगुती वीज कनेक्शनच्या तारा लूज झाल्या आहेत, अनेक ट्रांसफार्मर मधील पेट्यांमध्ये फ्युजा नाहीत, ट्रान्सफर्मर च्या केबल बदलणे, वाकलेले पोल सरळ करणेबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या त्यानुसार या अडचणी सोडवण्यासाठी शेतकरी व वीज ग्राहकांना भुर्दंड न देता महावितरण ची ही सर्व देखभाल दुरुस्तीची सर्व कामे ‘एक गाव एक दिवस’ अंतर्गत मोहीम राबवून कामे करण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.               त्यानुसार कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता प्रकाश पाटील, कनिष्ठ अभियंता प्रशांत गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी दि. 14जुलै23 रोजी उपविभाग पंढरपूर ग्रा. 1 व शाखा कार्यालय R-1 अंतर्गत सिद्धेवाडी येथे एक गाव एक दिवस मोहिम राबवली. त्या मध्ये सावकार DTC मध्ये वितरण बॉक्स दुरुस्ती,घुले DTC मध्ये 2 गाळे एल टी खराब तारा बदलल्या व 3 पाेल सरळ केले,भगीरथ एच टी लाईन तुटलेले 2 स्टे जोडले व 2 पोल सरळ केले,कुलकर्णी DTC वायर दुरुस्ती,वॉटर सप्लाय DTC चे 3 एच टी पाेल सरळ केले व 2एल टी पाेल सरळ केले.जल स्वराज DTC चे 3लूज गाळे ओढले.2 फॉल्टी मीटर मीटर बदलेले,1नवीन वीज कनेक्शन जोडले.तावशी गावातील गावठाण एल टी लाईन ला स्पर्श करनाऱ्या 6गाळ्याच्या फांद्या तोडल्या. ही कामे करण्यात आली.

      पंढरपूर मंगळवेढा व सांगोला या तिन्ही तालुक्यामध्ये वीज ग्राहकांना व शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने व अखंडितपणे वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असून ज्या ज्या ठिकाणी देखभाल दुरुस्ती करावी लागणार आहे. तेथील सर्व कामे एक गाव एक दिवस ही मोहीम राबवून करून दिली जाणार आहेत ,तसेच ग्राहकानी आपले वीज बिल वेळेत भरावे असे आवाहन कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी केले आहे .

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More