Take a fresh look at your lifestyle.

मंगळवेढ्याच्या दक्षिण भागात आले म्हैसाळ चे पाणी, मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात- आ.समाधान आवताडे

आ समाधान आवताडे यांच्या हस्ते म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचे पूजन

992

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
            मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या म्हैसाळ योजनेचे पाणी या भागात आले असून येत्या काही दिवसात 24 गावांसाठी असलेली मंगळवेढा उपसा सिंचन योजना देखील अंतिम टप्प्यात असून ती लवकरच मार्गी लागून या योजनेचे काम तातडीने सुरू होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
            मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागात म्हैसाळ उपसा सिंचन पाणी योजनेअंतर्गत आलेल्या पाण्याचे पूजन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते व ग्रामस्थ मंडळींच्या उपस्थितीमध्ये शिवणगी या ठिकाणी करण्यात आले. गेली अनेक वर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या भागातील जनतेला म्हैसाळ योजनेतून पाणी मिळवून देण्यासाठी आ आवताडे यांनी अधिवेशनावेळी तसेच सरकार पातळीवर आवाज उठवला होता तसेच उपसा सिंचन सुरु होण्यासाठी आवाज उठवून तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन सदर पाणी या भागातील जनतेसाठी उपलब्ध करुन दिले आहे. तसेच पंतप्रधान कृषी तंत्र योजनेतूनही या योजनेसाठी भरघोस निधी मंजूर झाल्याने मोठी मदत झाली आहे.
            आ आवताडे यांनी या उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळवून देण्यासाठी या विभागातील अधिकारी व पदाधिकारी यांची वेळोवेळी विचारविनिमय व आढावा बैठक घेऊन ही मार्गी लवकरात – लवकर कार्यान्वित करण्यासाठी आदेशीत करुन आवश्यक सूचना केल्या होत्या. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने या योजनेची माहिती घेऊन योजनेसंदर्भात असणाऱ्या सर्व तांत्रिक त्रुटी दूर करुन ही योजना सुरु होण्यासाठी सहकार्य केले आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमधून रेवेवाडी, पडोळकरवाडी, लोणार, महमदाबाद हु., शिरनांदगी, मारोळी या गावांना वितरकेद्वारे तर चिखलगी, जंगलगी, बावची, पौट, सलगर बु., सुलगर खु., या गावांना बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाण्याची सुविधा मिळणार आहे.

           अकरा गावांसह सदर योजनेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या लवंगी, आसबेवाडी, येळगी, सोड्डी, शिवणगी, सलगर खु. आणि सलगर बु या गावांचा पूर्व भाग या गावांनाही बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी मिळण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तसेच या उपसा सिंचन योजनेद्वारे उर्वरित सर्व गावांनासुद्धा लवकरच पाणी मिळणार आहे.
मतदारसंघातील धोरणात्मक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विविध योजनांच्या पूर्ततेसाठी आपल्या विकासात्मक नेतृत्वाच्या माध्यमातून प्रयत्नशील असणारे लोकप्रतिनिधी म्हणून आ आवताडे यांनी यापुढील काळामध्येही तालुक्यातील विविध पाणीप्रश्नांवर काम करुन उर्वरित पाणी मार्गी लावून तालुक्यातील जनतेची तहान भागवणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला आहे. पाणी पूजन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी व नागरिकांनी आ आवताडे यांचे ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत करुन आपला आनंद व्यक्त केला.तसेच आ समाधान आवताडे यांनी पाणी प्रश्नासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल नागरिकांतून कौतुक केले जात आहे.
              या वेळी जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर,अंबादास कुलकर्णी, दत्तात्रय जमदाडे, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, दिलीप चव्हाण, विजय माने, धनंजय पाटील, दिगंबर यादव, रावसाहेब फटे यांचेसह या भागातील विविध गावांचे आजी – माजी सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More