Take a fresh look at your lifestyle.

मोह अवरेना …. प्रांताधिकारी समिंदर व जेल मध्ये असलेल्या तलाठ्याने रजेवर असतानाही महामार्ग बाधित शेतकऱ्याला टक्केवारी घेऊन दिला चेक

शिवसेनेचे गेजगे यांची विभागीय आयुक्ताकडे तक्रार

667

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

मंगळवेढ्याचे प्रांत अधिकारी दि.29 एप्रिल ते 12 मे अखेर रजेवर असताना राष्ट्रीय महामार्गात भूसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला स्वत:च्या सहीने व कारागृहात असलेल्या तलाठ्याच्या सहीने टक्केवारी घेऊन बाधीत शेतकर्‍याला चेक दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याची लेखी तक्रार पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गेजगे यांनी केली आहे.

             या घटनेची हकीकत अशी, मंगळवेढ्याचे प्रांत अधिकारी हे दि.29 एप्रिल ते 12 मे अखेर रजेवर गेले आहेत. सध्या कार्यभार अन्य प्रांत अधिकार्‍याकडे देण्यात आला आहे. जुनोनी ता.सांगोला येथील गट नं. 365 हा राष्ट्रीय महामार्गात भूसंपादन झालेल्या जमिनीचा जवळपास एक कोटीचा मोबदला रजेवर गेलेल्या प्रांत अधिकार्‍यांनी स्वत: सही करुन तसेच सध्या कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेला तलाठी आरोपी याने त्याच्यावर सह्या करुन टक्केवारी घेऊन तो चेक बाधीत शेतकर्‍याला दिला असल्याचा आरोप संजय गेजगे यांनी केला आहे.

          याबाबत त्यांनी आपल्या लेटरपॅडवर पुणे विभागीय आयुक्त, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आदींकडे लेखी तक्रार करुन ही गंभीर घटना असल्याने याची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी होवून संबंधितावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More