मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ‘आवताडे किंग’
18जागेवर निर्विवाद वर्चस्व 13जागा बिनविरोध तर 5 जागा मताधिक्याने विजयी
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये पाच जागांवर आवताडे गटाने विरोधी गटाला पराभावाची धूळ चारत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला असून आवताडे यांनी सहकारातील आपणच किंग असल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे.
दिनांक 28 रोजी झालेल्या निवडणुकीत 92टक्के इतके मतदान झाले होते लगेचच झालेल्या मतमोजणीत 5 ही जागावर मताधिक्य मिळवत वर्चस्व मिळवले आहे यापूर्वी 13जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे व आ समाधान आवताडे यांनी आपली सत्ता कायम ठेवलीआहे.मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे व आ समधान आवताडे यांच्या गटाच्या13 जागा बिनविरोध झाल्या होत्या. ग्रामपंचायत2 व महिला2 व अनुसूचित जाती 1 अशा पाच जागेसाठी 5जागांसाठी 9उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. त्यासाठी आज 1438 पैकी 1323जणानी मतदानाचा हकक बजावला आहे.
मतदानानंतर तासाभराने झालेल्या मतमोजणीत आवताडे गटाचे पाचही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आसुन विरोधी उमेदवारांना त्यांची जागा आवताडे गटाने दाखवून दिली आहे.समविचारी आघाडीने आपले सर्व अर्ज माघारी घेतल्याचे सांगितले होते परंतु त्यांच्या चार समर्थकांनी आपले चार अर्ज कायम ठेवले होते त्यामुळे निवडणूक लागली होती.कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव अवताडे व आमदार समाधान आवताडे हे दोघे एकत्र आले आहेत.
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे गटाची सत्ता होती. पाच जगासाठी झालेल्या निवडणुकीत सोसायटी महिला मतदारसंघातून दोन जागेसाठी तीन अर्ज राहिले होते त्यात सविता यादव 794,कविता बेदरे 794 इतकी मते मिळवून विजयी झाल्या आहेत.ग्रामपंचायत सर्वसाधारण गटा मध्ये दोन जागेसाठी तीन अर्ज राहिले होते त्यांमध्ये असून जगन्नाथ रेवे 436 गंगाधर काकणकी 441 इतकी मते मिळवून विजयी होवून विरोधी उमेदवारांना रिंगण दाखवले आहे. मागासवर्गीय गटातून एका जागेसाठी तीन अर्ज राहिले होते त्यात पांडुरंग कांबळे यांना 402 भाजपाचे हौसाप्पा शेवडे 82, वैभव सोनवले 1अशी मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व मिस्टर नगराध्यक्ष सोमनाथ माळी यांनी अट्टाहासाने आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता. त्यांना 101मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा संगीता कट्टे केवळ 2मते मिळाल्याने त्यांचा नामुष्कीजनक पराभव झाला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काका पुतण्या यांनी एकत्र येत सत्ता कायम ठेवली असून 18 जागा वर विजय संपादन करत आपला सहकार क्षेत्रातील दबदबा कायम ठेवला आहे . निकाल लागल्यानंतर आवताडे गटाने जल्लोष साजरा केला
यापूर्वी सोसायटी मतदार संघातून बिनविरोध झालेले सदस्य – विष्णुपंत अवताडे, सिद्धेश्वर अवताडे, सुशील अवताडे, नानासो चोपडे,मनोज चव्हाण प्रकाश जुंदळे,धनंजय पाटील.ओबीसी प्रवर्गातून बिराप्पा माळी,एन टी प्रवर्गातून सहदेव लवटे बिनविरोध निवडून आले आहेत.आर्थिक दुर्बल गटातून आनंद हर्षराज बिले,व्यापारी मतदार संघातून बबनराव आवताडे,बसवंत माळी,हमाल तोलार मतदार संघातून प्रवीण कोंडूभैरी हे बिनविरोध निवडून आले आहेत.

