Take a fresh look at your lifestyle.

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती साठी विक्रमी 145 अर्ज दाखल

सत्ताधारी बबनराव आवताडे, आमदार समाधान आवताडे व समविचारी आघाडीच्या समर्थकांचे अर्ज दाखल

1,103

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी

          मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 18 जागांसाठी विक्रमी 145 अर्ज दाखल झाले आहेत.यात प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हा चेअरमन बबनराव आवताडे, माजी सभापती विष्णुपंत आवताडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे, विद्यमान सभापती सोमनाथ अवताडे, उद्योजक सुशील आवताडे,संजय पवार, अजित जगताप, प्रवीण खवतोडे,रामेश्वर मासाल, सचिन शिवशरण, सुमैय्या लतिफ तांबोळी, प्रकाश जुंदले दयानंद सोनगे,अंबादास कुलकर्णी,विजय माने यांचे प्रामुख्याने अर्ज दाखल केले आहेत.

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुकीसाठी अर्ज दाखल होण्याची ही पहिली वेळ आहे. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी बबनराव अवताडे गट,आ. समाधान आवताडे गट व समविचारी आघाडी या तिन्ही गटाने आपल्या कार्यकर्त्यांचे अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीमध्ये शेतकरी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गटात उमेदवारी अर्ज दाखल करता येत असल्यामुळे अर्ज संख्या यावेळी वाढली आहे.
सहकारी संस्था मतदारसंघातून 46, महिला राखीव 13, इतर मागासवर्गीय 13, भटक्या जमाती विमुक्त जाती 12, ग्रामपंचायत सर्वसाधारण 27, अनुसूचित जाती जमाती15,आर्थिक दुर्बल 8, व्यापारी मतदारसंघ 7, हमाल तोलार मतदारसंघ 4असे एकूण 145अर्ज दाखल झाले आहेत. दिनांक पाच एप्रिल रोजी होणार असून या छाननीच्या वेळी एकमेकावर आक्षेप घेवुन प्रतिस्पर्ध्याला निवडणुकीच्या रिंगणातून बाद करण्याचे धोरण आखले जात असल्याची चर्चा होत असल्याने या दिवशी वातावरण टाईट राहणार आहे .

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More