Take a fresh look at your lifestyle.

राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न- काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत साळे यांचा आरोप

राहुल गांधी यांच्या वरील कारवाईचा मंगळवेढा तालुका काँग्रेसकडून निषेध

234

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी
          काँग्रेस नेते राहुल गांधी मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात आवाज उठवत असल्याने सरकारकडून राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाकडून रद्द करण्यात आली आहे.असा आरोप काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत साळे यांनी केला आहे.

             ते पुढे म्हणाले की राहुल गांधींनी संसदेच्या सभागृहात आणि संसदेच्या बाहेरही नेहमी आपली मते कोणालाही न घाबरता मांडली आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे . सरकार राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी हुकूमशाही पद्धतींचा अवलंब करत आहेत सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय मुद्दा असो, गांधी यांनी आपलं मत मोकळेपणाने मांडलं आहे. त्यांना कदाचित त्याचीच किंमत मोजावी लागत आहे. चीन, जीएसटी, नोटबंदी विषयी नेहमी खर ते बोलतात. त्यामुळेच त्यांचा आवाज दडपला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.त्यामुळे मंगळवेढा काँग्रेस च्या वतीने आमचे नेते राहुल गांधी यांच्यावर राजकीय आकसापोटी केलेल्या कारवाईचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो असे साळे म्हणाले.

         यावेळी तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, ज्येष्ठ नेते नंदकुमार पवार, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप जाधव, अमोल म्हमाणे, विष्णु शिंदे, शहराध्यक्ष राजाभाऊ चेळेकर, सरचिटणीस पांडुरंग जावळे, मतदारसंघ अध्यक्ष मारुती वाकडे, सुरेश कोळेकर व मंगळवेढा तालुक्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More