मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात झालेल्या चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आणण्यात मंगळवेढा पोलिसांना यश आले असून याप्रकरणी 6आरोपीना अटक केली असून त्यांच्याकडून कडुन 1 लाख 90 हजार रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे
याबाबत मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पो नी रणजित माने यांनी माहिती देताना सांगितले की मंगळवेढा तालुक्यात झालेल्या चोरीच्या तपासात पोलिसांना यश आले असून पहिल्या घटनेत फिर्यादी वैजनाथ जनार्दन शिंदे मंगळवेढा हे भारत फायनान्स मध्ये लोन ऑफिसर म्हणुन नेमणुकीस असुनते भेासे येथुन बचतगटाचे वेगवेगळया ठिकानावरुन पैसे घेवुन मंगळवेढा येथे येत असताना सांगोला नाका येथे आले असता त्यांचे पाठीमागुनएका युनिकॉर्नगाडीवरुन अनोळखी तिन इसमांनी त्यांचा पाठलागकरुन सांगोलानाका जवळ चाकुचाधाकदाखवुनफिर्यादीकडील 45,356 रुपये रोख रक्कम व एक टॅबतसेच बायोमेर्टीक मशीन असलेली बॅग हिसकावुन घेतली होती याप्रकरणी संशयीत तिन आरोपी ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता आरोपीनी गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गुन्हयात तिन आरोपी अटक करुन त्यांचेकडुन गेलेल्या रकमेपैकी एकुन 25 हजार रुपये रोख रक्कम व गुन्हयात वापरलेली युनिकॉर्न दुचाकी मोटारसायकल 75 हजार रुपये किमतीचे गाडी जप्त करण्यात आली असुन असेएकुन 1 लाख रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत फिर्यादी महादेव चिंतु लेंडवे, रा- लेंडवे चिंचाळे, हे घरी जेवन करुन झोपले असता दोन इसमानी अनोळखी इसमांनी कोयत्याने फिर्यादीच्या डेाक्यात मारुन मोबाईल व पैसे जबरदस्तीने काढुन घेतले पत्नीचे गळयातील 20 हजार रुपये किमतीचे मंगळसुत्रातील मनी जबरीने चोरी करून घेवुन गेले होते याप्रकरणी संशयीत एक आरोपी ताब्यात घेवुन त्याच्याकडून 3 ग्रॅम वजनाचे 15 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी जप्त करण्यात आले आहेत.
तिसऱ्या घटनेत भाळवणी ते पंढरपुर येणाऱ्या रोडवर सातारा नाल्याजवळ दोन अज्ञात चोरटयांनी फिर्यादीच्या मोटारसायकलाला लाथ मारुन फिर्यादीकडील बॅग हिसकावुन रक्कम रुपये 1,68,240 रुपये रोख रक्कम, एक टॅब चोरुन नेला होता यात अटकेतील आरोपीने फिर्यादीनेच आरोपीशी संगणमत करुन जबरी चोरी करण्याचा बनाव केल्याचे उघड झाले आहे चौथ्या गुन्ह्यात फिर्यादी मयुर महादेव पाटील रा- डोंगरगाव, याच्या ज्युपिटर मोटारसाकल एमएच 13 सीई 5388 च्या डिक्कीमध्ये ठेवलेली एक लाख रुपये रोख चोरी झाली होती याप्रकरणी तिन आरोपी अटक करुन त्यांचेकडुन गेला रकमेपैकी एकुन 35 हजार रुपये रोख रक्कम जप्तकरण्यात आला आहे. पाचव्या घटनेत नागनेवाडी, येथील तलावाच्या शेजारी असणाऱ्या ओपन जीम 2 लाख रुपये किमतीचे साहित्य चोरुन नेल्याप्रकरनी पोलीसनिरीक्षक रणजीत माने यांनी आरोपीकडुन 40 हजार रुपये किमती माल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्हयामध्ये एकुन 6 आरोपी अटक करुन त्यांचेकडून एकुन चार गुन्हयातील 2 लाख रुपयेकिमतीचा मुददेमाल जप्तकरण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण शिरीष देशपांडे अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, राजश्री पाटील मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, मंगळवेढा पोलीस ठाणे, सपोनि बापु पिंगळे, पोहेकॉ/दयानंद हेंबाडे, पोहेकॉ/हजरत पठाण, पोना सुनिल मोरे, पोकॉ अजित मिसाळ, पोकॉ अजय शिंदे, पोकॉ वैभव घायाळ पोना युसुफ पठाण यांनी गुन्हयाचा तपासकामी मदत केली आहे.

