Take a fresh look at your lifestyle.

शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम काळाची गरज :- उद्योजक संजय आवताडे

165 जणांवर मोफत उपचार 61जणांनी केले रक्तदान

486

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शरीराकडे लक्ष देणे आवश्यक असून शरीराबरोबर मन देखील तंदुरुस्त ठेवावे शारीरिक व मानसिक आरोग्य निरोगी असणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उद्योजक संजय अवताडे यांनी व्यक्त केले
          मारापूर चे लोकनियुक्त सरपंच तथा माणगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव माधवराव यादव यांच्या ४३व्या वाढदिवसानिमित्त मारापूर ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या रक्तदान व सर्वरोग निदान शिबिराचा शुभारंभ आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा.लि.चे चेअरमन तथा नामवंत उद्योगपती संजयजी आवताडे यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते
          प्रारंभी श्री.आवताडे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आवताडे म्हणाले की कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व यांचा विधायक संगम साधून विविध सामाजिक कार्यनैतिकतेचा मानदंड प्रस्थापित करणारे सरपंच यादव यांचे नेतृत्व या भागातील जनतेसाठी विकासाचे वाटसरू म्हणून उदयास येईल असा विश्वास व्यक्त केला
          महाआरोग्य व रक्तदान शिबिराच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ.विवेक निकम यांनी आरोग्य व त्या संदर्भातील सर्व समस्यांचे सविस्तर विवेचन केले. सदर वेळी डॉ. नितीन आसबे डॉ. धवलसिंह आवताडे,डॉ.विजय लवटे डॉ.मंजिरी आसबे,डॉ.सदानंद माने, डॉ.रोहिणी निकम व मारापुरचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या रक्तदान शिबिरामध्ये 61 लोकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तर 165 लोकांवर मोफत उपचार करण्यात आले.
             याप्रसंगी उद्योजक राजाभाऊ यादव, माजी संचालक भुजंगराव आसबे, विक्रम यादव, श्री.बबनराव आवताडे पतसंस्थेचे व्यवस्थापक संजय भुसे,बालाजी यादव, भगवान आसबे, पिंटू मांडवे,नाथा माने, डॉ सत्यवान यादव ,संतोष गांडुळे इत्यादी मान्यवर, शरदचंद्र पवार कृषी माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक उपसरपंच अशोक आसबे यांनी तर आभार प्रदर्शन दादासाहेब इंगोले यांनी केले

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More