आर्थिक मजबुतीसाठी दामाजीने डिस्टीलरी प्रकल्प उभा करावा- प्रा. शिवाजीराव काळुंगे
दामाजीची गाळप क्षमता प्रतिदिन 5 हजार मे टन करणार :शिवानंद पाटील
मंगळवेढा प्रतिनिधी
येणाऱ्या काळात कारखान्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी डिस्टीलरीशिवाय कारखानदारीला पर्याय नाही. त्यामुळे डिस्टलरी उभारणीच्या दृष्टीने संचालक मंडळाने योग्य नियोजन करावे तरच कारखानदारी टिकेल असे प्रतिपादन धनश्री समूहाचे संस्थापक प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांनी केले
संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा सन 22-23 क्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ सोमवार दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी दामाजी साखर कारखान्याचे माजी चेअरमनअड नंदकुमार पवार यांचे शुभहस्ते व धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा शिवाजीराव काळुंगे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते
या कार्यक्रमासाठी रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहूल शहा , जिजामाता पतसंस्थेचे मार्गदर्शक रामकृष्ण नागणे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.यावेळी बोलताना काळुंगे पुढे म्हणाले, दामाजी कारखान्याने चालू गळीत हंगाम यशस्वी केला असून साखर उताऱ्यात सोलापूर जिल्हयात दुस-या क्रमांकावर रहिला आहे. प्रशांत परिचारक, भगिरथ भालके यांचे सहकार्य तसेच राहूल शहा, रामकृष्ण नागणे, दामोदर देशमुख आदिंनी आर्थिक सहकार्य केल्यामुळेच कारखाना वेळेत चालू झाला.संचालक मंडळाच्या योग्य नियोजनामुळे कारखाना चांगला चालल्याने सभासद ,कर्मचारी, ठेकेदार यांचे पेमेंट वेळेवर झाले आहे
यावेळी चेअरमन शिवानंद पाटील म्हणाले, ही संस्था सभासदांच्या मालकीची राहिली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील असून चालू गळीत हंगामात कारखान्याने ११५ दिवसात ३,८२,००० मे टन ऊसाचे गाळप केले आहे यावर्षी ऊसाचे टनेज कमी निघाल्याने गाळप कमी झाले आहे. सध्या कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन २५०० मे टन प्रतिदिन असुन येणार्या हंगामापासुन प्रतिदिन ५००० मे टन करण्याचा संचालक मंडळ प्रयत्न करित आहे या गळीत हंगामामध्ये शेतक-यांची ऊस बिले, कामगार पगार,तोडणी वाहतुक ठेकेदारांची बिले वेळेवर दिलेली आहेत. येत्या पंधरा दिवसांत हंगामअखेर गळीतास आलेल्या ऊसाचे बिलही संचालक मंडळ देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
या वेळी माजी चेअरमन अड नंदकुमार पवार , राहूल शहा, लतिफ तांबोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यकारी संचालक सुनिल दळवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले याप्रसंगी कारखान्याचे व्हा चेअरमन तानाजीभाऊ खरात, जिजामाता महिला पतसंस्थेच्या चेअरमन आशाताई नागणे, भारत पाटील, जालींदर व्हनुटगी, चंद्रशेखर कोंडूभैरी, अड रविकिरण कोळेकर, बबलू सुतार, विद्यमान संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, औदुंबर वाडदेकर, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, पी.बी.पाटील, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर,यांच्यासह अड दत्तात्रय खडतरे, दौलत माने, संपत गडदे माधवानंद आकळे, हेमंत निकम, तायाप्पा गरंडे, बाबासोा पडोळकर, यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद,ऊस तोडणी-वाहतूक ठेकेदार, खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते।
तोडणी वाहतुकीचे जास्तीत जास्त काम केलेले ठेकेदार दयानंद गरंडे,सुनिल जाधव,बंडु करे, लक्ष्मण गरंडे, मधुकर सोलनकर, सखराम पठाडे,आप्पा सानप, वसंत दोलतडे,हरी घोडके,विष्णु चव्हाण यांचा संचालक मंडळाचे वतीने सत्कार करण्यात आला.
सुत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी तर आभार संचालक दिगंबर भाकरे यांनी मानले.

