Take a fresh look at your lifestyle.

मंगळवेढ्यात वीस वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला

पाच जणाविरुध्द गुन्हा दाखल

1,927

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी

मोटार सायकलवर जाणार्‍या  मंगळवेढा येथील राज दत्तू यास तुला खूप मस्ती आली आहे असे म्हणत कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी करत आमच्या नादाला लागला तर तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी आकाश मुदगूल,चैतन विटकर, ऋतिक मुदगूल,आकाश काळे,समर्थ घोडके (सर्व रा.वडरगल्ली,मंगळवेढा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
             पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी राज सदाशीव दत्तू (रा.दत्तू गल्ली) हे सुरवसे अँड कंपनी आडत व्यापारी येथे कॉम्प्युटर ऑपरेटर असून ते दि.15 रोजी कामकाज करुन रक्कम भरण्यासाठी राजमाता बँकेत फिर्यादी व त्याचा मित्र एम.एच.13 सी.एक्स 2762 या मोटार सायकलवरुन 11.30 वाजता गणेशबाग समोरुन जात असताना पाठीमागून वरील आरोपींनी येवून तुला खूप मस्ती आली आहे असे म्हणून गाडीस लाथा मारुन खाली पाडले, त्यानंतर आरोपीने कोयत्याने फिर्यादीच्या पाठीवर,कानाच्या पाठीमागे कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. आमच्या नादाला लागला तर तुला जीवंत सोडणार नाही असे धमकी देवून आरोपी निघून गेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More