Take a fresh look at your lifestyle.

सरकारी योजनांचा लाभ घेवून महिलांनी उद्योजकतेकडे वळावे – आ समाधान आवताडे

शनिवार पेठेत आ आवताडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन

295

- Advertisement -

 

मंगळवेढा  प्रतिनिधी

        केंद्राच्या लोकल फॉर होकल या धोरणाचा लाभ घेवून महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहुन मोठ्या प्रमाणात उद्योजकतेकडे वळावे असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा येथील शनिवार पेठ येथे देशसेवा ट्रस्ट, पीपल्स पाॅवर आॅफ नेशन, अंबिका बहुउद्देशीय संस्था, साई ओम महिला बचत गट यांच्या मार्फत व शशिकांत नाना चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आलेल्या महिला मेळाव्याप्रसंगी आ आवताडे बोलत होते

       यावेळी पुढे आवताडे म्हणाले , केंद्र सरकार सध्या लहान व्यवसायांना चालना मिळण्याकरता प्रयत्नशील असून महिलांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतला पाहिजे . छोटे बचत गट असतील तसेच वैयक्तिक असेल अश्या माध्यमातून गारमेंट सारख्या व्यवसायाला भरपूर मोठ्या प्रमाणात अनुदान सरकार देत आहे . याचा फायदा महिलांनी घेतला पाहिजे . आज अनेक योजना माता भगिनींसाठी मोदी सरकार ने आणले आहे त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे . कोणत्याही क्षेत्रात आज महिला मागे नाहीत आपण देखील ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत आपला व्यवसाय पुढे नेऊ शकतो . सरकार आज कर्ज पुरवठा करत आहे आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे . असे त्यांनी सांगितले

           महिलांच्या सक्ष्मीकरणासाठी मंगळवेढा मध्ये तयार झालेले वस्तूंचे मार्केटिंग मेट्रो पोलिटन शहरामध्ये करुन मार्केट मिळवून देवु असे सामाजिक कार्यकर्ते आदित्य हिंदुस्थानी यांनी सांगितले.

     यावेळी आमदार आवताडे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या खोमनाळ नाका येथील सांस्कृतिक भवन, भारत इंगोले घर ते अर्जुन हजारे कोपरा, इंगळे गल्ली रस्ता व गटार करणे, जगदंबा मंदिर झोपडपट्टीतील महादेव माने घर ते सार्वजनिक शौचालयापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण,चव्हाण यांच्या घरासमोरील योग भवन, सांगोला नाका ते सनगर गल्ली रस्ता काँक्रिटीकरण, सरगर गल्ली ते रेखा पवार घर रस्ता काँक्रिटीकरण, लक्ष्मी मंदिर समोर सांगोला नाका येथे हायमास्ट दिवा बसवणे आधी विकासकामांचा लोकार्पण सोहळा आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला

       सामाजिक कार्यकर्त्या शशिकला मुदगुल यांच्या वतीने हा सन्मान सोहळा व महिला मेळावा आयोजित केला होता . यावेळी जवाहरलाल शेतकी हायस्कूल च्या विद्यार्थिनी ढोल वाजवत आमदार समाधान आवताडे यांचे स्वागत केले . तसेच लहान मुलींनी मर्दानी खेळ दाखविले 

         या कार्यक्रमास   प्रदीप खांडेकर,सोमनाथ अवताडे शशिकांत चव्हाण, चंद्रकांत पडवळे,राजेंद्र सुरवसे विनायक यादव, शिवाजी जाधव,नागेश डोंगरे,पांडुरंग नाईकवाडी अशोक माळी दिगंबर यादव, अनिल बोदाडे कैलास कोळी अड डी सी जाधव,ज्योती चव्हाण, संगिता राजपुत, सुनिता चव्हाण, आशा पाटील, रतन दिवसे, प्रभावती कोकरे, विमल मुदगुल, कविता मुदगुल, मंगल पवार, कमल मुदगुल, सविता पवार, सविता धोत्रे, शकुंतला कर्णेकर,ज्योती जाधव, उर्मिला चव्हाण, अश्विनी चव्हाण, सविता विटकर, मंगल डांगे, शबनम बुखारे, आरती सावजी,आरती माने, माधुरी हजारे , योगिता शिंदे, सोनाली गडहिरे, संगिता मुदगुल, रूपाली गवळी, ललिता मुदगुल, सुरेखा शिंदे, ताई जाधव, वैशाली पवार, अनिता पवार, रेखा पवार, चित्रा खरबडे, सुषमा मुदगुल, निर्मला पवार, अश्विनी साळुंखे, चंदा शेवडे, अलका पांढरे, कल्पना भोसकर, अर्चना गायकवाड, लता दिघे, ललिता गाडिवडार, शिवानी महादेव, प्रियंका कुर्हाडे, अनिता गुंगे, स्मिता अवघडे, संध्या अवघडे , शुभांगी सूर्यवंशी, ज्योती चव्हाण, कुमुदीनी घुले, भाग्यश्री वाकडे आदी  मोठ्या संख्येने उपस्थित होते

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More