Take a fresh look at your lifestyle.

मनोजकुमार यादव यांना केंद्र शासनाचे आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर

मारापूर येथील सुपुत्राचा केंद्राकडून होणार सन्मान

270

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी

मारापुर ता मंगळवेढा येथील राज्य पोलीस दलात कार्यरत असलेले मनोज माधवराव यादव यांना केंद्र शासनाकडून आंतरिक सुरक्षा  सेवा पदक घोषित करण्यात आले आहे यामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे
इंग्लिश स्कूल १९८५ मध्ये ते दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पदवी परीक्षा दिली पदवी परीक्षेनंतर त्यांन राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून पोलीस उपनिरीक्षक पदी यश मिळवले सध्या ते पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत रांजणगाव, सोलापूर ग्रामीण वाहतूक शाखा आदि बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपली सेवा बजावली आहे त्यांनी नागपूर येथे पोलीस दलात असताना अंतर्गत सुरक्षा मोहिमेत मोलाची कामगिरी केल्याने केंद्र शासनाने त्यांना आंतरिक सुरक्षा पदक जाहीर केले आहे त्यांना मिळालेल्या पदकाबद्दल आमदार समाधान आवताडे, अवताडे शुगरचे चेअरमन संजय अवताडे, मारापूरचे सरपंच विनायक यादव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, सिद्धेश्वर जाधव, सुहास गोपाळकर, डॉ महेश भोसले,एजाज धाराशिवकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे

Whatsapp Group Join

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More