मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथिल यश सचिन कुंभार वय 2 या दोन वर्षीय बालकाचा शेत तळ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.एकुलता मुलगा असल्याने या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
दि 24 रोजी बोराळे येथे सचिन कुंभार हे शेतात रहात असून त्यांच्या घराशेजारी शेततळे आहे त्या तळ्याला गेट असून ते बंद केलेले होते साडेचार पाच च्या सुमारास यश घराबाहेर खेळत होता तर घरातील महिला घरकामात दंग असताना नजर चुकवून यश हा गेट च्या खालून खेळत खेळत शेतातील शेततळ्यामध्ये गेल्याने तो पाण्यात पडून मयत झाला 10 मिनिटात यश दिसत नसल्याचे लक्षात येताच त्याची शोधा शोध केली असता तो तळ्यात पडल्याचे लक्षात आले परन्तु तो पर्यंत यश चा मृत्यू झाला होता सायंकाळी पाच च्या दरम्यान ही घटना घडली
या घटनेची माहिती श्री शैल्य कुंभार यांनी मंगळवारी पोलिस स्टेशनमध्ये माहिती दिली असून अकस्मात अशी नोंद झाली आहे . या घटनेचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल महेश कोळी हे करत आहेत


वाईट झालं