शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी तर महेंद्र गायकवाड बनला उप महाराष्ट्र केसरी
मंगळवेढ्याच्या शिरपेचात मनाचा तुरा
मंगळवेढा प्रतिनिधी
पुणे येथे झालेल्या महराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे याने मंगळवेढा येथील पैलवान महेंद्र गायकवाड याला चितपट करीत महाराष्ट्र केसरी झाला असून महेंद्र गायकवाड उप महाराष्ट्र केसरी झाला आहे
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अस्थायी समितीच्या मान्यतेने संस्कृती प्रतिष्ठान आयोजित ६५ वी मानाची कुस्ती स्पर्धा पुण्यात सुरू आहे. पुण्यातील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी इथं महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी आज सायंकाळी अंतिम फेरी झाली अंतिम फेरीसाठी झालेल्या महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यात कुस्तीत सिकंदर शेख याच्यावर मात करून अंतिम फेरीत पोचला अंतिम फेरीत शिवराज राक्षे विरुद्ध महेंद्र गायकवाड यांची कुस्ती झाली त्यामध्ये पुण्याच्या शिवराज राक्षे यांने महाराष्ट्र केसरी पदावर नाव कोरले तर महेंद्र गायकवाड हा उप महाराष्ट्र केसरी झाला महाराष्ट्र केसरी विजेत्याला महिंद्रा थार जीप आणि पाच लाखांचे रोख बक्षीस मिळणार आहे. उपविजेत्याला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. डॉ ढवलसी मोहिते पाटील यांच्याकडून चांदीची गदा व बक्षीस दिले जाणार आहे
मंगळवेढा तालुक्यातून पै दामू मंडले,पै समाधान घोडके यांनी अंतिम फेरीत पोचून महाराष्ट्र केसरी झाले होते त्यानंतर बऱ्याच वर्षांनी शिरशी सारख्या ग्रामीण भागातून पै महेंद्र गायकवाड याने महराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारत टक्कर दिली आहे त्याच्या यशात आई ,वडील बाबासाहेब, त्याचे चुलते पै काकासाहेब गायकवाड, अर्जुन पुरस्कार विजेते उस्ताद काका पवार, बबन राऊत,नागनाथ गायकवाड,मुबारक मुलाणी यांचे मोठे योगदान आहे पै महेंद्र गायकवाड यांच्या विजयामुळे मंगळवेेेढा तालुक्यात सर्वत्र आनंद व्यक्त होत असून शिरशी या गावात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली

