Take a fresh look at your lifestyle.

महावितरण मंगळवेढा ग्रामीण शाखा कार्यालयाची 100 टक्के वीजबिल वसुली

कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्याकडून शून्य थकबाकी केल्याबद्दल अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार

559

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

वीज ग्राहकांना पुरेशा दाबाने व अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण बांधील असून मूलभूत पायाभूत सोईसुविधा उभारणीसाठी वीज ग्राहकांनी वेळेवर वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी केले.

            महावितरण पंढरपुर विभागातील मंगळवेढा उपविभाग अंतर्गत येणाऱ्या शाखा कार्यालय मंगळवेढा ग्रामीणमधील घरगुती,व्यावसायिक,औद्योगीक व इतर प्रवर्ग वीज ग्राहकांची थकबाकी शुन्य झाली आहे.त्यानिमित्त शाखा अभियंता व कर्मचारी यांच्या सरकार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. 

       महावितरण कडून मार्च24 अखेर सर्वच वीज ग्राहकांची वसुली करण्यावर भर दिला असून मंगळवेढा शाखा कार्यालयाने 100टक्के वसुली करून थकबाकी शून्य केली आहे. वसुली कामी पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, मंगळवेढा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मंगळवेढा ग्रामीण शाखा अभियंता प्रशांत गायकवाड, लाईनमन सुनील घाटेराव,वरिष्ठ तंत्रज्ञ सदानंद शिंदे व सर्वच जनमित्र तसेच यंत्रचालक या सर्वांनी मिळुन एकजुटीने काम करुन हे उद्दीष्ट साध्य केले आहे. 

        यावेळी कार्यकारी अभियंता पाटील म्हणाले,सद्या महवितरण ग्राहकांना चांगली सेवा मिळावी यासाठी नवीन डिपी उभारणी,नवीन वीजजोड, दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून या कामासाठी पैसा महत्वाचा असल्याने ग्राहकांनी देखील वीज बिलाचे रक्कम भरून सहकार्य करणे गरजेचे आहे. जन मित्रांनी केलेले सेवेमुळे वीज ग्राहकांनी विज बिल भरण्याबरोबरच ऍडव्हान्स वीज बिल भरण्यास देखील मंगळवेढा ग्रामीण ही शाखा मंगळवेढा उपविभागात प्रथम क्रमांक वरती आहे त्यामुळे त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

        100 टकके वसुलीबद्दल पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील,मंगळवेढा विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांच्या हस्ते शाखा अभियंता प्रशांत गायकवाड,संभाजी दोडके,भारत सातपुते,अशोक ढोणे, मोहन कवडे, संतोष गाथाडे,रवींद्र कांबळे, दत्तात्रय गोडसे, विकास हेंबाडे,पार्वती बेंडेकर, पार्वती वाकडे,समाधान बावचे विजय ढेकळे, रणजित बेद्रे, आकाश घोडके, रोहित कदम, सादिक अत्तार, ओंकार रणे, सागर पवार, सिद्धेश्वर भोसले, रोहित डोके यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More