मंगळवेढयाच्या सोमनाथ कंठीकर ची दैदिप्यमान कामगिरी
महावितरण च्या राज्यस्तरीय अंतरपरीमंडलिय क्रीडा स्पर्धेत मिळवली दोन गोल्ड मेडल पदक
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा शहर महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक म्हणून कार्यरत असणारे सोमनाथ शिवलिंग कंठीकर यांनी महावितरण कंपनीच्या संभाजीनगर येथे १ ते ४फेब्रू 2024 दरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय रिले 4 /100 मिटर व खो-खोअंतरपरीमंडलिय क्रीडा स्पर्धेत दोन्ही प्रकरात दोन गोल्ड मेडल पदक मिळवत मंगळवेढयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
मंगळवेढ्याचे सुपुत्र सोमनाथ शिवलिंग कंठीकर यांची परिस्थिती अतिशय बेताची असून त्यांनी गरिबीतून शिक्षण घेत विद्युत सहाय्यक म्हणून कार्यरत झाले. त्यांना खेळाची आवड असल्याने त्यांनी महवितरण च्या सर्व क्रीडा स्पर्धा मधे ते सहभाग घेत असतात. त्यानी नुकत्याच संभाजीनगर येथे पार पडलेल्या महावितरणच्या राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धे त रिले व खो-खो या क्रीडा प्रकारात दोन गोल्ड मेडल मिळवले आहेत. त्यानी एकाच वेळी दोन गोल्ड मेडल मिळवल्याने महाराष्ट्र राज्यामध्ये मानाचा तुरा रोवून मंगळवेढा महावितरण व मंगळवेढा तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.
त्याच्या या यशाबद्दल पंढरपूर कार्यकारी अभियंता विजय पाटील,उप कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील, शाखा अधिकारी सचिन कोळेकर यांनी अभिनंदन केले आहे.तसेच महवितरण मंगळवेढा शाखा अधिकारी सचिन कोळेकर व सर्व स्टाफ यांनी कंठीकर यांचा सत्कार केला. व पुढील काळात मंगळवेढा तालुक्याचे व महावितरण चे नाव आणखी उज्ज्वल करावे अशा शुभेच्छा दिल्या.

