Take a fresh look at your lifestyle.

मनमानी पणे व उद्धटपणे वागणाऱ्या आंधळगाव च्या ग्रामसेवक मोरे यांची बदली करावी अन्यथा 26 जानेवारी रोजी उपोषण करन्याचा सरपंच व सदस्यांचा इशारा

497

- Advertisement -

 

मंगळवेढा  प्रतिनिधी

आंधळगाव ग्रामपंचायत येथील ग्रामविकास अधिकारी अविनाश मोरे हे मनमानी कारभार करून सरपंच सदस्यांशी व नागरिकांशी उद्धट पणे वर्तणूक करीत असून त्यांची तत्काळ बदली करावी अन्यथा 26जानेवारी 24रोजी पंचायत समिती मंगळवेढा येथे उपोषणास बसणार असल्याचे सह्यांचे निवेदन सरपंच व सदस्यांनी गटविकास अधिकारी शिवाजी पाटील यांना दिले आहे.

ग्रामपंचायत आंधळगाव येथील ग्रामविकास अधिकारी करे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी गटविकास अधिकारी पाटील यांनी कोणालाही विचारात घेता भोसे येथे वादग्रस्त ठरलेले अविनाश मोरे यांना आंधलगाव येथील दोन महिन्यापूर्वी पदभार दिला होता. आंधलगाव येथे गेल्या दोन महिन्यापूर्वी सत्तांतर झाले असून सरपंच, सदस्य पदी युवकांची निवड झाली आहे.आंधलगाव येथील पदभार घेतल्यापासून मोरे हे सरपंच उपसरपंच व सदस्य यांना विश्वासात न घेता परस्पर मनमानी कारभार करून त्यांच्याशी उद्धट पणे वर्तणूक करतात तसेच नागरिकांना हि उद्धट पणे बोलतात तसेच मोदी आवास घरकुल योजना प्रस्ताव मध्ये त्यांच्या कडून छेडछाड करण्यात आली आहे. तरी लवकरात लवकर त्यांची बदली करून नवीन ग्रामसेवकांना ग्रा.प. आंधळगाव चा पदभार देण्यात यावा. मोरे यांची तात्काळ न झाल्यास २६ जानेवारी रोजी आम्ही सर्व ग्रा.प सदस्य व सरपंच पंचायत समिती मंगळवेढा येथे उपोषणास बसणार आहेत.

कोट –

आंधळगाव येथील ग्रामसेवक मोरे संदर्भातील तक्रारीचे निवेदन आले असून त्याची चौकशी केली जाईल.

-शिवाजी पाटील, गटविकास अधिकारी

कोट-

ग्रामसेवक मोरे हे मनमानी व दंडपणे वागत असून त्यांच्या बदलीसाठी तक्रार केली असून गटविकास अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास 26 जानेवारी रोजी उपोषणास बसणार आहे

-सरपंच लव्हाजी लेंडवे

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More