मंगळवेढा प्रतिनिधी
आवताडे उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक तथा आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने आदर्श उद्योजक पुरस्काराने सोलापूर येथे राज्याचे मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते आदर्श उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाप्रसंगी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विविध मान्यवर व पदाधिकारी आणि इतर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
उद्योजक आवताडे यांनी एस. एम.आवताडे कन्स्ट्रक्शन कंपनी, आवताडे स्पिनर्स प्रायव्हेट लिमिटेड, आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रायव्हेट लिमिटेड आदी व्यावसायिक दालनांच्या माध्यमातून हजारो युवकांच्या हाताला काम देऊन सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचे काम केले आहे. आवताडे उद्योग समूहाच्या रूपाने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली उद्योजक संजय आवताडे हे नेहमी निरनिराळ्या उद्योजकीय कल्पना आत्मसात करण्याचा नेहमी ते प्रयत्न करत असतात.

