मराठा आरक्षण: ठरावात छेडछाड करणाऱ्या ग्रामविकास आधिकाऱ्याच्या प्रतिमेस भोसे ग्रामस्थांचे जोडोमार आंदोलन
ग्रामपंचायतीला टाळे ठोकत ग्रामविकास अधिकाऱ्यास केली गावबंदी
मंगळवेढा प्रतिनिधी
सकल मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भोसे ता मंगळवेढा येथील ग्रामपंचायत सदस्यानी मासिक सभेत राजकीय नेते व पुढारयाना गावबंदींच्या करण्यात आलेल्या ठरावांमध्ये ग्राम विकास अधिकाऱयांने ठरावाच्या विरोधात मत नोंदवल्याने संतप्त झालेल्या भोसे येथील ग्रामपंचायत सदस्य व सकल मराठा बांधवांनी ग्रामविकास अधिकारी अविनाश मोरे प्रतिमेस जोडे मारून निषेध व्यक्त केला.ग्रामपंचायतीला टाळे ठोकत ग्रामविकास अधिकाऱ्यास गावबंदी केली असून त्याच्या मनमानी कारभाराच्या चौकशीची मागणी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व ग्राम विकास मंत्री यांच्याकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वत्र सकल मराठा समाजाच्या वतीने गावोगावी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत विविध स्वरूपाची आंदोलने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दि 27ऑक्टो 2023 रोजी भोसे येथे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक मीटिंगमध्ये जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांना गावबंदी करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्याचे ठरले व त्यानंतर सदर चा ठराव तयार केल्यानंतर सर्व सदस्यांनी जोपर्यंत सकल मराठा समाजाच्या शासन निर्णय याप्रमाणे आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सर्व प्रकारच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असे बहुमताने ठरले परंतु शेवटी गरज नसताना ग्रामविकास अधिकारी मोरे यांनी प्रशासकीय दृष्टीने विचार करता आपण कोणासही गावात येण्याकरता बंदी करू शकत नाही. ठराव जरी सर्व सदस्यांनी केला असला तरी या ठरावाशी सचिव या नात्याने सदर ठरावासी सहमत नसल्याचे नमूद केले. त्यामुळे आरक्षणाचा विषय राज्यात तापलेला असताना ग्राम अधिकारी मोरे यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा स्वतःचे मत मुद्दाम पणे टाकून सकल मराठा समाजाच्या व ग्रामस्थांच्या भावना दुखावण्याचे काम केले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
त्यामुळे संतप्त सकल मराठा बांधवांनी दिनांक 29 रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्रित येत ग्रामविकास अधिकारी मोरे यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांचा निषेध केला.असून ग्रामविकास अधिकारी केल्या तीन वर्षापासून भोसे येथे कार्यरत असून नेहमी मनमानी कारभार करतात. ग्रामस्थांना वेटीस धरतात, सदस्याची मते विचारात घेत नाहीत, ग्रामस्थांचे आर्थिक पिळवणूक करतात. ग्रामपंचायत मधील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ग्रामस्थांना नाहक त्रास देणे. विकास कामे करताना दर्जाहीन कामे करणे आठवड्यातून एक व दोन दिवस हजर असणे, विकास कामाबाबतची जबाबदारी ग्रामविकास अधिकारी ची असताना देखील ते माझे काम नाही, सदस्यांनी कामे करून घ्यावीत अशी उडवा उडवीची उत्तरे देतात, ग्रामस्थांना योग्य वागणूक देत नाहीत, ग्रामसभेमध्ये विकास कामाची माहिती दिली जात नाही. कागदपत्री ग्रामसभा दाखवतात. तरी ग्रामविकास अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मुख्यमंत्री,ग्रामविकास मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे. तसेच जोपर्यंत बेजबाबदारपणे वागणारयावर वरिष्ठ कारवाई करीत नाहीत तोपर्यंत सदर ग्रामविकास अधिकाऱ्यास गाव बंदी करण्याचा निर्णय सर्वांना घेऊन ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यास टाळे ठोकले.
सदर प्रकाराबाबत ग्राम अधिकारी अविनाश मोरे यांच्याशी वा संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
कोट
महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सकल मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत पाठीबा देण्यासाठी सदस्य व ग्रामस्थानी केलेल्या प्रमाणे ठरावं देत असताना देखील महाराष्ट्रातील फक्त भोसे ग्रामपंच्यातीचे ग्रामविकास अधिकारी मोरे यांनी मुद्दाम विरोधात मत नोंदवून मराठा समाजाच्या भावना दुःखावण्याचे काम केले आहे त्यामुळे सर्वांनीच ग्रामविकास अधिकाऱ्यास गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बाळासाहेब काकडे, उपसरपंच भोसे

