Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादीचे नेते व रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांच्यासह चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

सचिवाच्या खोट्या सह्या करून विद्या विकास मंडळ संस्थेचा बोगस चेंज रिपोर्ट बनवला

4,171

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील विद्या विकास मंडळ या संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती शुभदा सुभाष शहा यांना अध्यक्ष करणेसाठी 29ऑगस्ट2021 रोजी श्री संत दामाजी महाविदयालय मंगळवेढा येथे संस्थेची कोणतीही सभा झालेली नसताना सभा झाल्याचे बोगस दाखवुन त्यावर आमच्या बनावट सहया केल्या.तसेच धर्मादाय उपायुक्त यांचेकडे पाठविलेले संमती पत्र व नाहरकत पत्र यावरही परस्पर आमच्या नावाच्या बनावट सहया करून खोट्या सहया केलेली कागदपत्रे खरी आहेत असे भासवुन धर्मादाय उपायुक्त यांचेकडे सादर करून चेंज रिपोर्ट मंजुर करुन घेतल्याप्रकरनी संस्थेचे अध्यक्ष श्रीमती शुभदा सुभाष शहा,राहुल सुभाष शहा,उपाध्यक्ष बाबासाहेब उर्फ भिमराव विठठल पाटील ,सचिव किसन जगन्नाथ गवळी यांचेविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे सचिव ऍड रमेश दीनानाथ जोशी यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
           मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत अड. रमेश जोशी यांनी म्हटले आहे की
सन 1978 साली स्व. रतनचंद शिवलाल शहा यांचे नेतृत्वाखाली श्री विदया विकास मंडळ या नावाची रजीस्टर संस्था मंगळवेढा येथे सुरु केली होती. सदर संस्थेमार्फत श्री. संत दामाजी महाविद्यालय व श्री संत दामाजी हायस्कूल चालविले जाते. सदर संस्थेचा मी 1978 सालचा संस्थापक सभासद असून सध्या श्री विद्या विकास मंडळ मंगळवेढा येथे सचिव पदावर कार्यरत आहे. सदर संस्थेमध्ये 8 जनांचे कार्यकारी मंडळ आहे.श्री संत दामाजी महाविद्यालयामध्ये शिक्षक नोकर भरती प्रक्रीयेसाठी 20 व 21 जून 2023 रोजी मुलाखती होत्या त्या सभेमध्ये संस्था प्रतिनीधी म्हणुन कोणी बसायचे यावर थोडासा वाद झाला.

          संस्थेचे अध्यक्ष अजित शहा असताना किसन गवळी यांनी शिक्षण सहसंचालक काकडे यांना संस्थेचे अध्यक्ष अजित शहा ऐवजी एस. एस. शहा यांची सही असलेले पत्र दिले त्यावेळी अड जोशी यांनी अध्यक्षाची सही नाही, असे सांगताच किसन गवळी यांनी चॅरिटी कमिशनर (धर्मादाय उपायुक्त) कडील चेंज रिपोर्ट दाखवला त्यावेळी श्री विदया विकास मंडळ या संस्थेचा अध्यक्ष या श्रीमती शुभदा सुभाष शहा असल्याचे दाखवले. परंतु मी संस्थेचा सचिव असुनही अध्यक्ष बदलाची कोणत्याही प्रकाराची माहीती दिली नाही. चेंज रिपोर्टवरती दि. 17ऑगस्ट2021 रोजी संस्थेची सर्वसाधारण सभेची नोटीस दाखवली आहे व दि. 29ऑगस्ट 2021 रोजी सभा झाल्याचे दाखविले आहे. त्या सभेत सदरच्या निवडी झाल्याचे नमूद केले आहे. त्यावेळीही आम्ही हजर नव्हतो, ती सभाच झालेली नाही. त्या सभेची नोटीस वगैरे काहीही मला मिळालेली नाही, मागील पाच ते सहा वर्षापासुन एकही जनरल मिटींग झालेली नाही. त्यानंतर मी धर्मादाय उपायुक्त यांना पत्र देवुन सर्व कागदपत्रांची मागणी केली असता त्यामध्ये 12सप्टेंबर2022 रोजी नाहरकत प्रमाणपत्र व संमती पत्र दिले असुन त्या पत्रावर माझ्या नावाच्या पुढे माझी सही केल्याचे दिसून आले.

           परंतु कुठेही त्या चेंज रिपोर्टवरती मी सहया केलेल्या नाही. ती सही मी पाहीली असता ती सही मी केली नसुन माझी सही कोणीतरी खोटी व बनावट सही केली आहे. त्यानंतर मी माहीती घेतली असता आमच्या संस्थेचा अध्यक्ष हा प्रत्यक्ष 2018 मध्येच चेंज केला असुन त्यावेळीसुध्दा कोणतीही सभा झालेली नव्हती. तसेच खजिनदार बाळकिसन गोपीलाल मर्दा हे तथाकथित दाखविलेल्या दि. 28ऑगस्ट 2021 चे मिटींगनंतर एक महिन्याचे आत मयत झाले आहेत. त्यापुर्वी ते सहा महिन्यापासुन अंथरुणावर झोपुन होते. तसेच माझ्याबरोबर मागील व विद्यमान कार्यकारीणीमध्ये डॉ. अशोक दामोदर सुरवसे रा. सोलापूर हे देखील आहेत. त्यांची देखील खोटी सही केल्याबददल तक्रार आहे. खोटया सहया केल्याचे समजल्यावर मी व डॉ. अशोक सुरवसे आम्ही मिळून सोलापूरला जाउन धर्मदाय उपायुक्त याच्याकडे दि. 24 जुलै2023 रोजी लेखी तक्रारी अर्ज दिला आहे.               

      तसेच पुणे येथील सोल्युशन या संस्थेचे हॅन्ड रायटिंग एनालिस्ट राजेंद्र भिडे यांच्याकडुन सह्यांची अधिकृत तपासणी करून अहवाल आणला आहे. त्यामुळे आमच्या सहया खोटया केल्याची त्या रिपोर्टवरून सिद्ध झाले त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष श्रीमती शुभदा सुभाष शहा यांना अध्यक्ष करणेसाठी 29/08/2021 रोजी श्री संत दामाजी महाविदयालय मंगळवेढा येथे कोणतीही सभा झाली नसताना आमच्या बनावट सहया करून धर्मादाय उपायुक्त यांचेकडे पाठविलेले संमती पत्र व नाहरकत पत्र यावर बनावट सहया केल्या आहेत.तसेच धर्मादाय उपायुक्त यांचेकडे बोगस चेंज रिपोर्ट सादर करून फसवणुक करुन चेंज रिपोर्ट मंजुर करुन घेतला आहे.

          त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष श्रीमती शुभदा सुभाष शहा, राहुल सुभाष शहा, उपाध्यक्ष बाबासाहेब उर्फ भिमराव विठ्ठल पाटील, सचिव किसन जगन्नाथ गवळी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा मंगळवेढा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.यातील राहुल शहा हे रतनचंद शहा बँकेचे विद्यमान चेअरमन असून खा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. गेल्या काही दिवसापासून रतनचंद शहा बँक व विद्या विकास मंडळ या दोन संस्थेतील गैरव्यवहारा विरोधात संस्थेचे पदाधिकारी असलेले रमेश जोशी हे कायदेशीर माध्यमातून लढा देत आहेत. विद्या विकास मंडळाच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे मंगळवेढ्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.या घटनेचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More