विकासात्मक कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही -आ.समाधान आवताडे
मंगळवेढा शहरामध्ये ३ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न
मंगळवेढा प्रतिनिधी-
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये विकासात्मक कामांसाठी आपण निधी कमी पडू देणार नाही.रस्ते, पाणी, वीज आरोग्य यासह विविध कामांसाठी निधीची उपलब्ध मोठ्या प्रमाणात होत असून विकास कामांचा बॅकलॉग भरून काढणार असल्याचे प्रतिपादन आ समाधान आ समाधान आवताडे यांनी केले.
आ आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा शहरामध्ये मंजूर झालेल्या तब्बल ३ कोटी निधीच्या विकास कामांचे भूमिपूजन आ आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कामांमध्ये बोराळे नाका ते सांगोला नाका रस्ता सुधारणा अंतर्गत डांबरीकरण करणे – २ कोटी २५ लाख, हजारे गल्ली धर्मशाळा ते प्रवीण हजारे घर रस्ता – २२.०० लाख, दिगंबर यादव घर ते सांगोला रस्ता – २२. ०० लाख,चोखामेळा चौक ते मुरलीधर चौक रस्ता १२.०० लाख, पवार घर ते प्रकाश नलवडे घर रस्ता २०.०० लाख अशी एकूण ३ कोटी रुपये एवढ्या निधीच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे.
मंगळवेढा शहरातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने वरील कामांसाठी निधी उपलब्ध होणेसाठी आ आवताडे यांनी संबंधित शासकीय विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरु ठेवला होता. गेली अनेक वर्षे निधीअभावी प्रलंबित असणाऱ्या या रस्त्यांसाठी आ आवताडे यांच्या माध्यमातून भरीव निधी मंजूर झाल्याने शहरातील महत्वपूर्ण रस्ते आता चकाचक होणार आहेत. मंगळवेढा शहरातील नेहमीच वर्दळ आणि रहदारीचा असणारा सांगोला नाका ते बोराळे नाका रस्त्याची पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वत्र चिखल व दूषित आणि घाण पाणी यांचे साम्राज्य निर्माण होऊन अतिशय बिकट अवस्था होते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असे, तसेच आतापर्यंत या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेकांना अपघातामध्ये आपला प्राण गमवावा लागला होता. तर काहींच्या कायमस्वरूपी अपंगत्व वाट्याला आले आहे. आता या रस्त्याची डांबरीकरण रूपाने सुधारणा होणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी प्रांताधिकारी बी आर माळी, न.पा. प्रशासन अधिकारी विनायक साळुंखे,बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, राजेंद्र सुरवसे, भाजपा जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, कैलास कोळी, पांडुरंग नाईकवाडी- कोळी, मुरलीधर घुले, दिगंबर यादव, दादासाहेब ओमणे, दिलीप आसबे, आझाद दारुवाले, युवराज शिंदे, प्रताप सावंजी, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, सुशांत हजारे, पप्पू दारुवाले, संजय माळी, रमेश टाकणे, खंडू खंदारे, अशोक लेंडवे, बाबा कोंडुभैरी, सतिश कोंडुभैरी, प्रशांत गायकवाड, सरपंच सचिन चव्हाण, आनंद मुढे, नवनाथ दिवसे, महेश हजारे, सुधीर हजारे, दिपक उन्हाळे, अक्षय काळुंगे, तानाजी जाधव, आबा हजारे, लतिफ मकानदार, अशोक उन्हाळे, सचिन माने, बाळासाहेब थोरवत, आदी मान्यवर, संबंधित विभागाचे अधिकारी, पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

