मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुशील आवताडे व उपसभापतीपदी नानासो चोपडे
युवा उद्योजकाला संधी
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुशील आवताडे यांची तर उपसभापती पदी नानासो राजाराम चोपडे यांची दिनांक 22रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे व आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकहाती सत्ता स्थापन झाली होती या बाजार समितीच्या नूतन संचालक मंडळाची सोमवारी दिनांक 22रोजी नूतन पदाधिकारी निवडीची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी ए ए गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.यावेळी सभापती पदासाठी उद्योजक सुशील आवताडे व उपसभापती पदासाठी नानासो चोपडे यांचे प्रत्येकी एक अर्ज आल्याने या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या आहेत
या निवडीच्या च्यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीनुतन संचालक बबनराव आवताडे, सिद्धेश्वर आवताडे, मनोज चव्हाण, प्रकाश जुंदळे, धन्यकुमार पाटील, कविता बेदरे, सविता यादव, बिराप्पा माळी, सहदेव लवटे, गंगाधर काकणकी, जगन्नाथ रेवे, आनंद बिले, पांडुरंग कांबळे, बसवंत पाटील, प्रवीण कोंडुभैरी, सचिव सचिन देशमुख आदी उपस्थित होते.
कोट-
बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न केले जातील केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणून शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती चा नावलौकिक वाढवून एक आदर्श बाजार समिती बनवणार –
मा.सुशील आवताडे, नूतन सभापती
निवडीनंतर नूतन सभापती सुशील आवताडे व उपसभापती नानासो चोपडे यांच्यासह नूतन संचालक मंडळाचा सत्कार यावेळी करण्यात आला.यावेळी सिध्देश्वर आवताडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांनी शेतकरी हा घटक मानून त्यांच्या हितासाठी बाजार समितीच्या माध्यमातून काम करावे असे सांगत निवडणूक काळात व आता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी दामाजीनगरचे सरपंच जमीर सुतार, संजय जगताप,उद्योजक दिलीप उघाडे, नामदेव पडवळे, अँड.दत्ता तोडकरी, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, उद्योजक शैलेश आवताडे,प्रमोदकुमार म्हमाने, शंकरराव मेटकरी, दिलीप सावंत, माजी पं स सदस्य संजय पवार,संजय नागणे बसू माळी कमलेश माळी,दासू शिंदे, विजय जावळे, लक्ष्मण हेंबाडे आदी उपस्थित होते.

