Take a fresh look at your lifestyle.

मंगळवेढयातील घरफोडी उघडकीस : आरोपी जेरबंद : 75 हजाराचे सोन्याचे दागिने जप्त

पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या पथकाची कामगिरी

1,302

- Advertisement -

मंगळवेढा  प्रतिनिधी
          खडकी ( ता मंगळवेढा) येथील घरफोडी उघड करण्यात मंगळवेढा पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने यांच्या पथकाला यश आले असून यामध्ये चोरीला गेलेले ७५ हजाराचे सोने जप्त केले आहे
१ ऑक्टोबर २०२२ रोजी बलभिम एकनाथ लवटे (रा. खडकी ता. मंगळवेढा) हे त्याच्या घराला कुलूप लावून सांगोला येथे गेले असता दुपारी २.३० ते सायंकाळी ०७/३० वा. दरम्यान त्याच्या बंद घराचे दरवाज्याचे कडी-कोयडा व कूलूप तोडून घरात प्रवेश करून बंद घरातील कपातील सोन्याचे दागिने हे चोरून नेल्याबाबतची तक्रार मंगळवेढा पोलीस ठाण्यास दाखल होती. त्याबाबत पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी त्यांचे तपास टिम तयार करून सदर गुन्हयातील आरोपी जयवंत दिलीप काळे वय ३५ वर्षे रा. खडकी ता. मंगळवेढा जि.सोलापूर शोध घेवून त्यास सदर गुन्हयात अटक केली आरोपी कडे गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सदर आरोपीने सदर घरातील सोन्याच्या दागिने हे चोरून नेल्याबाबत कबूली दिली असून सदर आरोपी कडून पंचनाम्याद्वारे चोरी केलेले दागिने काढून दिले.त्यामध्ये
75 हजार किंमतीच्या तीन पिवळया धातूचे प्रत्येकी ०५ ग्रॅम वजनाच्या अंगठया हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कामगिरी ही पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे ,अप्पर पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव , डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रणजीत माने व त्याचे पथकातील सपोनि बापू पिंगळे, पोसई धापटे, पोहेकॉ कोळी, पोहेकॉ मोरे, पोहेकॉ पठाण, पोहेकॉ हॅबाडे, पोना काळे, पोना मारे, पोका मिसाळ, पोको घायाळ, पोकॉ आवटे, पोका कदम आदींनी सदरची कामगिरी केलेली आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More