मंगळवेढा प्रतिनिधी
संताचा परमार्थ उच्च कोटीचा होता म्हणूनच संत विचारांची गरज निर्माण झाली आहे मुखी भगवंताचे नाम घेतले पाहिजे असे मत जेजुरीचे ह.भ.प. मनोज महाराज मोरे यांनी व्यक्त केले.
संत शिरोमणी संत चोखाबाराय यांच्या ६८५ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या किर्तनात बोलत होते. प्रारंभी अजित जगताप,मुरलीधर दत्तू ,प्रविण खवतोडे, दिगंबर भगरे,बाबुराव राजमाने,मलकप्पा राजमाने,दिलावर मुजावर,जयराज शेंबडे,पठाण शिवशरण,सतीश दत्तू,स्वप्निल फुगारे,फारुख मुजावर आदींच्या हस्ते चोखोबांच्या समाधीचे पूजन करण्यात आले.
यावेळी मोरे महाराज यांनी आम्हा न कळे ज्ञान या चोखोबांच्या चार चरणाच्या अंभगातून कोणत्याही प्रकारची जात न मानणारा वारकरी हा एकमेव संप्रदाय आहे असे सांगितले मंगळवेढया सारख्या संत नगरीत किर्तन करण्याची सेवा मिळणे हे भाग्याचे आहे . देवाला ओळखा,देव अनुभवावा लागतो,खरा देव माणसात आहे चोखोबांची भक्ती श्रेष्ठ होती म्हणून पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेला प्रत्येक भक्त पहिल्यांदा चोखोबांच्या समाधीचे दर्शन घेतात याप्रसंगी वेशभूषेतील किर्तनात दंग झालेले बाल वारकरी विशेष आकर्षक ठरले.यावेळी सर्व वारकरी,वारी परिवाराचे सदस्य उपस्थित होते किर्तनाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा विनायक कलुबर्मे यांनी केले.

