Take a fresh look at your lifestyle.

महिलांनीच महिलांचा सन्मान ठेऊन प्रोत्साहन द्यावे : शोभाताई काळुंगे

लोकमंगल बँक व सोलापूर सोशल फाऊंडेशन कडून नारीशक्तींचा गौरव

893

- Advertisement -

मंगळवेढा  प्रतिनिधी
महिलांनीच प्रत्येक महिलेचा प्रथम सन्मान ठेवावा ,त्यांच्यातील सुप्त कलागुणांना व नेतृत्वाला प्रोत्साहन द्यावे ,त्यामुळे महिला पुढे येतील असे प्रतिपादन धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन शोभाताई काळुंगे यांनी केले.

        लोकमंगल को ऑपरेटिव्ह बँक लि.शाखा मंगळवेढा व सोलापूर सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवेढा येथे बँक ग्राहक मेळावा व जागदिन महिला दिनानिमित्त शोभाताई काळुंगे यांचे हस्ते विविध क्षेत्रातील कर्तृत्वत्वान महिलांचा ‘नारीशक्ती गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला  प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

            याप्रसंगी काळुंगे पुढे म्हणाल्या की राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी,क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले,छत्रपती ताराराणी,झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या कर्तृत्वाचा वारसा प्रत्येक स्त्रीने जपला पाहिजे. अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञानवादी व्हावे.आपल्या मुलांवर योग्य संस्कार करावेत. कोणतेही काम छोट नसतं, त्यामुळे लोकमंगल बँकेने तळागाळातील सफाई कामगार भगिनीचाही गौरव करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
            याप्रसंगी धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन शोभाताई काळुंगे,यशोदा पतसंस्थेच्या चेअरमन निलाताई आटकळे,लोकमंगल बँकेच्या संचालिका उज्वलाताई चेळेकर यांचे शुभहस्ते मंगळवेढयातील विविध क्षेत्रातील ११ कर्तृत्ववान महिलांना ‘नारीशक्ती गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये उद्योजिका स्मिता यादव, वायरमन पार्वती शिरसाट, आदर्श माता कमल खांडेकर, अंगणवाडी सेविका सुमन शेवले,शिक्षिका सारिका कोरे,एसटी वाहक सुमन कुंभार, सुरेखा नकाते(अध्यात्मिक),तलाठी जयश्री कल्लाळे,आशावर्कर अंजना हाके, सफाई कर्मचारी आशाताई जावीर व गायिका संगीता इंगोले आदींचा समावेश आहे.
             याप्रसंगी तालुक्यातील राज्य सेवा आयोग परीक्षेत सुयश प्राप्त सुधाकर लेंडवे, रोहित भगरे व प्रज्ञा फटे यांनाही मंगळवेढा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रणजित माने, सोलापूूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन संजय चेळेकर व मंगळवेढा बार असोसिएशनचे अध्यक्ष उल्हास माने यांचे हस्ते गौरव करण्यात आला.
          यावेळी नगरपालिका शाळेतील इयत्ता ३ री मधील विद्यार्थिनी समृध्दी डोरले,शुभ्रा देशमुख व प्रचिती जाधव यांनी सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचेवरील भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली. .
             शाखेचे व्यवस्थापक शिवाजी दरेकर यांनी प्रास्ताविकात सर्वांचे स्वागत करून बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. कार्यक्रमाची सुरूवात संगीता इंगवले व लहु ढगे यांच्या गायनाने झाली . तर संगीता इंगवले यांच्या ‘ये मेरे वतन के लोगो’ या देशभक्ती गीताने कार्यक्रमाची सांगता झाली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्रकुमार जाधव सर यांनी केले तर आभार सोलापूर सोशल फाऊंडेशनचे सल्लागार हरिभाऊ यादव यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशनचे विजय कुचेकर, अक्षय भोसले,सोमनाथ गायकवाड,संतोष बावचे व बापू कोंडूभैरी यांनी परिश्रम घेतले .

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More