Take a fresh look at your lifestyle.

मंगळवेढयात चोरटे शिरजोर, भरदिवसा बंगला फोडून 70 हजाराचा ऐवज पळविला

एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला, अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल

733

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

             मंगळवेढा शहरातील बनशंकरी कॉलनीतील ढगे कुटुंबिय दवाखान्याला उपचारासाठी बंगल्याला कुलूप लावून गेल्यानंतर चोरटयांनी भर दिवसा कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. तसेच चोरटयांनी याच परिसरात राहणार्‍या शिंदे यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला आहे.दरम्यान,या चोरीप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

         भरदिवसा चोरटे घरफोडया करीत असल्याने नागरिकांचे जीव टांगणीला लागले आहेत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी श्रीकांत ढगे हे शहरातील बनशंकरी कॉलनीत रहावयास असून दि.6 रोजी त्यांचे वडील आजारी असल्याने फिर्यादी हे वडील व आई यांना घेवून आंधळगाव येथील नडगिरे हॉस्पीटलमध्ये 5.30 वा. उपचारासाठी गेले होते.दरम्यान ते उपचार करून रात्री 8.00 वा. घरी परतले असता त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले.घरात जावून पाहिले असता कपडे अस्ताव्यस्त पडले होते. आईने तीच्या रूममधील कपाटाचा दरवाजा उघडा दिसल्याने कपाटात ठेवलेले 52 हजार 500 रुपये किमतीचे दीड तोळयाचे सोन्याचे मंगळसुत्र,17500 रुपये किमतीचे सोन्याचे कानातील वेल,फुले,झुबे असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेला आहे.ढगे यांच्या प्रमाणेच नागणे प्लॉटमधील शुभम ज्ञानेश्‍वर शिंदे यांचे घरी अज्ञात चोरटयाने घराचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला. मात्र रोख रक्कम,सोन्याचे दागिने चोरीला गेले नसल्याचे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

        चोरटयांनी ढगे यांच्या बंगल्याचे कुलूप प्रथमतः कापण्याचा प्रयत्न केला मात्र ते न कापल्यामुळे कटावनी घालून उचकटून काढल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होतेआतापर्यंत रात्री चोर्‍या होत असल्याचे नागरिकांनी ऐकले होते. मात्र मागील दोन आठवडयापासून भर दिवसा बंद घरांना चोरटे टार्गेट करीत असल्याचे चित्र आहे.सध्या सुगीचे दिवस सुरु असल्याने अनेक कुटुंबिय घराला कुलूप जावून शेतावर जात असल्याने या घरांची सुरक्षितता भर दिवसा होणार्‍या घरफोडीमुळे ऐरणीवर आली आहे.ढगे यांच्या घरफोडीतील चोरांचा शोध घेण्यासाठी सोलापूरातून श्‍वान पथक मागविण्यात आले होते. या श्‍वानला वास न मिळाल्यामुळे म्हणावा तसा उपयोग झाला नसल्याचे सांगण्यात आले.

       बंद घरे चोरटे फोडत आहेत.या चोरीमध्ये सोन्याचे दागदागिने चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त असल्याने कुटुंबियांनी आपले दागिने बँक लॉकरमध्ये सुरक्षितरित्या ठेवावेत.सध्या सुगीचे दिवस असल्यामुळे कुटुंबिय घराला कुलूप लावून जाताना शेजार्‍यांना  लक्ष ठेवण्यास सांगावे,जेणेकरून चोरी होणार नाही.
-रणजित माने,
पोलिस निरिक्षक,मंगळवेढा पोलिस

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More