Take a fresh look at your lifestyle.

तलाठी अनिल चव्हाण यांची कामगिरी, चोरट्या वाळूचे वाहन पकडून केला गुन्हा दाखल

5 लाख 8 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

849

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी

अवैध वाळू वाहतूक करुन बांधकामाच्या ठिकाणी टाकल्याप्रकरणी टमटम चालक गणेश वसंत हजारे (वय 20 रा.वाढेगाव ता.सांगोला) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी रड्डे सजेचे तलाठी अनिल चव्हाण हे दि.18 रोजी सकाळी दहाच्या दरम्यान पिकपाहणीचे काम करीत असताना त्यांना अवैध वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यांनी रड्डे,नंदेश्वर रोड वरील हनुमान वस्तीच्या जवळ नवनाथ सपकाळे यांच्या बांधकामाच्या ठिकाणी बिगर नंबरचा पांढर्‍या रंगाचा टमटम 8 हजार 400 रुपये किंमतीची एक ब्रास वाळू ओतत असल्याचे तलाठ्याला दिसून आले. सदर घटनेचा रिपोर्ट तहसिलदार यांना करुन वाहन चालक गणेश हजारे याला व 5 लाखाचे टमटम ताब्यात घेवून पोलिस स्टेशनला हजर केले. पोलिसांनी वाळू व टमटम सह 5 लाख 8 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
———–

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More