ध्येयवेड्या काळुंगे परिवारामुळे अनेकांच्या जीवनात अर्थक्रांती – ह.भ.प. जयवंत महाराज बोधले

प्रा शिवाजीराव काळुंगे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

 

मंगळवेढा प्रतिनिधी
ध्येयवेडी माणसे जगापेक्षा वेगळे धाडस करून सामाजिक भान जोपासत आपले मार्गक्रमण करीत असतात. तेच कार्य प्रा शिवाजीराव काळुंगे व शोभा काळुंगे कोणताही अंहभाव न जोपासता प्रामाणिकपणे करत असल्याचे प्रतिपादन ह भ प जयवंत महाराज बोधले यांनी मंगळवेढा येथे व्यक्त केले
                धनश्री परिवार व सीताराम परिवाराचे संस्थापक प्रा शिवाजीराव काळुंगे यांच्या 74व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभ व प्रवचन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर हुतात्मा कारखान्याचे चेअरमन वैभव नाईकवाडी,श्री श्री कारखान्याचे चेअरमन शेषराव अंकल, विठ्ठल चे चेअरमन अभिजित पाटील दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील, भीमा चे चेअरमन विश्वराज महाडिक, विठ्ठल चे माजी चेअरमन भगीरथ भालके, सीताराम महाराज कारखाण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजलक्ष्मी गायकवाड, शोभाताई काळूंगे, तुकाराम महाराज, रामचंद्र जगताप, जनकल्याण मल्टीस्टेट चे चेअरमन राजेंद्र हजारे,युवराज गडदे,शिवाजीराव पवार, सरपंच सीमा काळुंगे, प्रकाश काळुंगे, आदी उपस्थित होते
                यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रा शिवाजीराव काळुंगे व शोभाताई काळुंगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोधले महाराज म्हणाले की, शिवाजीराव काळुंगे पती-पत्नीचे कार्य कौतुकास्पद असून धनश्री परिवार व सीताराम परिवाराच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे संसार उभे करून बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिले आहे. दोघेही शिक्षक असताना देखील त्यांनी स्वतःचे आरामदायी जीवन जगण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या जगण्यात आराम आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असून समाजासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचे आर्थिक व सामाजिक राजकीय कार्य अनेकांना प्रेरणादायी ठरणारे आहे.
           यावेळी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले जिल्ह्यातील अनेक बंद पडू पाहणाऱ्या कारखान्यांना शिवाजीराव काळुंगे सरांनी आर्थिक मदत केल्यामुळे ते कारखाने जोमाने सुरू आहेत त्यांच्या मदतीमुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती निर्माण झाली आहे. तसेच सर्वसामान्य व बेरोजगार युवकांना केलेल्या मदतीमुळे अनेकांचे संसार उभे राहिले आहेत.
              यावेळी डॉ.राजलक्ष्मी गायकवाड म्हणाल्या आई आणि दादांचे व्यक्तिमत्व बहुआयामी असून त्यांच्या सामाजिक जाणीव मुळे धनश्री व सिताराम परिवाराच्या माध्यमातून अर्थकारण व समाजकारण याबाबतीत सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकरी व बेरोजगार युवकांसाठी कायम मदतीची भूमिका घेतल्याने अनेक जण यशस्वी झाले आहेत त्यांच्या कार्याचा व्याप वाढावा व त्याचा समाजाला फायदा व्हावा या हेतूने श्री शिवाजीराव काळुंगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून अमृत महोत्सवी वर्षात विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत.
          यावेळी अनेकांनी केवळ शुभेच्छा न देता सामाजिक भान ठेवत शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य देखील उपलब्ध करून दिले. दामाजी कारखान्याकडून काळुंगे यांच्या वजना एवढ्या वहयांची तुला करून भेट देण्यात आल्या. वाढदिवसानिमित्त बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले होते तसेच बालकाश्रम, वृद्धाश्रम, मूकबधिर शाळा या ठिकाणी शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रात पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

            यावेळी  सहकार शिरोमणी चे चेअरमन कल्याणराव काळे,जकराया चे एम डी सचिन जाधव उद्योजक नागेश फाटे, बाजार समितीचे चेअरमन सोमनाथ आवताडे, शेकाप चे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख, नानासाहेब लिगाडे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप, लतिफ भाई तांबोळी, दामाजी शुगरचे संचालक औदुंबर वाडदेकर, राजेंद्र पाटील,बसवराज पाटील, तानाजी काकडे,भारत बेदरे, दिगंबर भाकरे,  दयानंद सोनगे, दादा दोलतडे, भारत पाटील,अजित शिंदे,शिवाजीराव नागणे, चेतनसिंह केदार,दत्तात्रय बागल, यादाप्पा माळी, गौरीशंकर बुरकूल, दत्तात्रय पाटील, उमाकांत कनशेट्टी, रामचंद्र बंडगर, ईश्वर गडदे, अंकुश पडवळे, पैलवान मारूती वाकडे, नगरसेवक प्रवीण खवतोडे,सुनील पाटील रावसाहेब पाटील, सिद्धेश्वर कोकरे, ज्ञानेश्वर कोंडूभैरी ,सोमा बुरजे, राहुल सावंजी,लहू ढगे,, रंगनाथ काळुंगे, बाळकृष्ण काळुंगे, विठ्ठल काळुंगे, दत्तात्रय गायकवाड, मारुती काळुंगे, सुहास पवार, पत्रकार मल्लिकार्जुन देशमुखे, संभाजी नागणे, उल्हास पाटील संतोष पवार, अ‍ॅड.राहुल घुले, युवराज लुगडे,सुनील पाटील रावसाहेब पाटील, सिद्धेश्वर कोकरे, ज्ञानेश्वर कोंडूभैर,धनश्री पतसंसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनीता सावंत, धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे, श्री सदगुरू सिताराम महाराज साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर हणमंत पाटील, टेक्नीकल जनरल मॅनेजर सुर्यकांत पाटील, रवींद्र शिंदे,सुहास सावंजी,सुधाकर कट्टे,दिलीप कलुबरमे, उद्योजक गंगाराम खांडेकर, राहुल खांडेकर, दिलीप वेळापुरे, कबीर शेख, यांचेसह धनश्री महिला पतसंस्था, धनश्री मल्टिस्टेट व सदगुरू सिताराम महाराज अर्बन मल्टीस्टेटचे सर्व कर्मचारी व इतर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचा ७४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षांव केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार इंद्रजित घुले यांनी मानले.

Comments (0)
Add Comment