मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा नगरपालिकेला विविध कामासाठी विविध योजनेतून10 कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे परंतु येथील प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे विकास कामे रखडली आहेत मुख्याधिकारी साहेब तुम्हाला काम व्यवस्थित करायचे नसेल तर रजेवर जावा आम्हाला कोणाकडून काम करून घ्यायचे आहे हे माहीत आहे. 31 मार्चच्या आत मंजूर कामे पूर्ण करा अन्यथा गंभीर दखल घेऊ असा इशारा आ समाधान आवताडे यांनी दिला.
मंगळवेढा येथील नगरपालिकेचे सभागृहात मंगळवेढा शहरातील विविध विकास कामे व समस्या संदर्भात अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी आ समाधान आवताडे बोलत होते यावेळी प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर मुख्याधिकारी निशिकांत प्रचंड राव शशिकांत चव्हाण दत्तात्रय जमदाडे, येताळा भगत, सोमनाथ अवताडे, चंद्रकांत पडवळे, धनंजय खवतोडे, कैलास कोळी, नारायण गोवे, नागेश डोंगरे, दत्तात्रय भोसले, सुदर्शन यादव, आदित्य मुदगुल आदी उपस्थित होते यावेळी आवताडे म्हणाले, मंगळवेढा ही संतभूमी असून येथील शहरातील तुंबलेल्या गटारी,अस्वच्छ शौचालये,अंतर्गत रस्ते, यामुळे शहराची अवस्था वाईट झाली असून मिळालेल्या निधीतून साफसफाई चांगली ठेवावी, फवारणी वेळेवर करावी. सरकारकडून मंगळवेढा नगरपालिका क्षेत्रात विकास कामा साठी नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे .तो खर्च करन्यास व निधीची अंदाजपत्रके बनवण्यास चालढकल केली जात आहे हे योग्य नसून शहर विकासासाठी मारक आहे . निधीसाठी रात्रंदिवस सरकार दरबारी प्रयत्न करीत आहोत. पंढरपूर नगरपालिकेची इस्टिमेट लगेच तयार होतात परंतु मंगळवेढा नगरपालिकेची इस्टिमेट वेळेवर होत नाहीत असे सांगत मंगळवेढा नगरपालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. चालू असलेली कामे चांगल्या पद्धतीने करून घ्यावेत. जनतेच्या पैशाचा वापर चांगल्या पद्धतीने व्हावा. काम उत्कृष्ट पद्धतीने करावे, यापूर्वीची अनेक कामे निकृष्ट असून याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत मी निधी आणायला कमी पडत नाही तुम्ही खर्च करायला कमी पडू नका, आलेला निधी मार्चपर्यंत खर्च करावा अन्यथा निधी परत जाईल त्यामुळे शहराचे नुकसान होणार आहे. असलेला निधी खर्च करा अजून पाहिजे तेवढं निधी उपलब्ध करू. शहरातील बूजवलेले जलस्त्रोत पुन्हा सुरू करा,शहरासाठी लोकसंख्येनुसार वाढीव पाणीपुरवठा व्हावा यासाठी निधीचा प्रस्ताव तयार करून निधी मागणी करा,आता उन्हाळ्याचे दिवस असून पाण्याचे नियोजन चांगल्या पद्धतीने करा तसेच शहरातील गटारीचे सांडपाण्याचे नियोजन चांगल्या पद्धतीने करा
मंगळवेढा शहराचे पाण्याची स्तोत्र असणारे असून त्यातील काही विहिरी नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे कचरा टाकल्याने बुजलेले आहेत त्या खोदून जल स्तोत्र सुरू करावेत त्यासाठी पर्यटन विकास योजनेतून निधी उपलब्ध केला जाईल. घरकुलासाठी एकाही नागरिकांची तक्रार येवू देवू नये असे त्यांनी सांगितले.
यावेळी नागरिकांना घरकुलासाठी पैसे मागितले जातात, टाऊन हॉल साठी पाच कोटी रुपये मंजूर झाले त्याचे टेंडर हि झाले परंतु पुढे काही झाले नाही याची चौकशी व्हावी,नागरिकांनी शहरात सुरू असलेली निकृष्ट कामे गटारी व शौचालयांची दुरुस्ती वेळेवर होत नाही, नको त्या ठिकाणी निधीचा होणारा दुरुपयोग थांबवावा, स्वच्छतेची कामे वेळेवर करावी अनेक कामे मंजूर असूनही वेळेवर सुरू केले जात नाही, मंजूर निधीची इस्टिमेट बनवली जात नाहीत, महादेव विहीर दुरुस्ती, मंगळवेढा शहराची हद्द वाढ करावी, नगरपालिकेमध्ये समाविष्ट करून सोयी सुविधा द्याव्यात, स्वच्छता कर्मचारी वेळेवर स्वच्छता करत नाहीत, योगभवन व्हावे ठिकठिकाणी मुतारी बांधाव्यात अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली व आपल्या मागणीचे निवेदन दिले