आ समाधान आवताडे घेणार मंगळवेढा शहरातील विकासकामांच्या व समस्यांसंदर्भात 6 मार्च रोजी आढावा बैठक

बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांची माहिती

मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा शहरातील नागरिकांच्या समस्या व विकास कामाचा आढावा या संदर्भात सर्व अधिकारी व कर्मचारी नागरिक यांची संयुक्त बैठक आमदार समाधान आवताडे व प्रांत अधिकारी आप्पासाहेब समिंदर व नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली असून शहरातील नागरिकांनी या आढावा बैठकीसाठी व आपल्या अडीअडचणी व समस्या बाबत लिखित अर्जासह उपस्थित राहावे असे आवाहन मार्केट कमिटीचे सभापती सोमनाथ आवताडे यांनी केले आहे
             गेल्या काही दिवसात मंगळवेढा शहरासाठी आ. समाधान आवताडे यांनी विविध योजनेतून कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे या विकासकामांना गती देण्यासाठी व अजून नवीन विकास कामांच्या पूर्ततेसाठी तसेच शहर विकास कामांची या बैठकीत चर्चा होणार आहे तसेच नागरिकांनी देखील आपल्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी यावेळी उपस्थित राहून प्रश्न मांडावेत
             या बैठकीच्या वेळी नगरपालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सोमवार दिनांक 6मार्च रोजी दुपारी3.30वा नगरपालिका सभागृहात या बैठकीसाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सभापती आवताडे यांनी केले आहे.

Comments (0)
Add Comment