मंगळवेढा प्रतिनिधी
महाराष्ट्रात मंगळवेढा संतभूमी व ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध त्याबरोबरच साहित्य, सामाजिक, क्रीडा, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात सर्वगुणसंपन्न आहे सर्व क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या मंगळवेढेकरांनी आपले अस्तित्व जपायला हवे असे मत मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती ॲड.नंदकुमार पवार यांनी व्यक्त केले.
समाज उन्नतीचा ध्यास घेऊन गेल्या चार वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या झेप सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंगळवेढा येथील श्री संत दामाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या झेप सन्मान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जवाहरलाल हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिद्राम यादव होते. यावेळी व्यासपीठावर थोर संत साहित्यिक व इतिहास संशोधक डॉ.आप्पासाहेब पुजारी, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, बालाजी शिक्षण मंडळाचे सचिव राहुल रजपूत, संचालिका वैशाली रजपूत, डॉ.ममता रजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
झेप सन्मान सोहळ्यात रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांना स्वर्गीय लालसिंग रजपूत व्यक्ती नव्हे चळवळ पुरस्कार तसेच इतर व्यक्ती व संस्थांना झेप पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी तालुक्यातील वीस मुलींना सॅकचे वाटप करण्यात आले. बालाजी शिक्षण संस्थेचे सचिव राहुल राजपूत व डॉ.ममता रजपूत यांना सपत्नीक ऋण पत्र देऊन गौरवण्यात आले तसेच यावेळी राजेंद्र माळी, प्रा.मल्लेशा अरकेरी, डॉ.दत्तात्रय सरगर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
झेप पुरस्कारप्राप्त संस्था व व्यक्ती-
आदर्श संस्था- महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा-दामाजी नगर
आदर्श शाळा-नूतन हायस्कूल,बोराळे
धन्वंतरी पुरस्कार-आरोग्यवर्धिनी केंद्र, मरवडे
झेप स्व.लालसिंग रजपूत व्यक्ती नव्हे चळवळ- राहुल शहा
हिरकणी- कमल उर्फ सुनंदा खांडेकर
आचार्य बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकारिता-संभाजी नागणे
डॉ.अब्दुल कलाम सेवावृत्ती-नारायण माने
स्वामी विवेकानंद आदर्श शिक्षक-विशाल गायकवाड
झेप क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका-इंदिरा थोरात-चौधरी
उत्कृष्ट निवेदक-दिलीप बिनवडे
गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी-सुखदेव पवार
यावेळी डॉ.आप्पासाहेब पुजारी म्हणाले, हल्ली अनेकांच्या बाबतीत विद्येच्या अहंकारामुळे वाचन, लिखाण, संशोधन होत नाही स्वाभिमानाने जगायला शिकले पाहिजे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्राम यादव, राहुल रजपूत,राहुल शहा, दिलीप बिनवडे, डॉ.ममता रजपूत यांनीही मनोगत व्यक्त केले.
झेप सन्मान सोहळ्यात प्रास्ताविक प्राचार्य सुनील नष्टे, सूत्रसंचालन प्रा.रेश्मा गुंगे तर आभार संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मेलगे यांनी मानले.सोहळा यशस्वी करण्यासाठी समन्वयक प्रा.बसवराज पाटील, प्रा.मल्लेशा अरकेरी, प्रा.पुंडलिक पवार, प्रा.संतोष आसबे, विश्वजित साठे, संतोष जामगुंड, प्रा.अनुजा चौगुले-सोनगे, अश्विनी मेलगे, प्रकाश पवार यांनी परिश्रम घेतले.