मंगळवेढा प्रतिनिधी
नंदेश्वर येथील कै.पाराबाई माळी, कै. संगीता माळी व कै दीपाली माळी यांची हत्या मानसिक विकृती व सामाजिक अधोगती चे लक्षण असून आरोपीला कडक शिक्षा होवून माळी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असे मत दामाजीचे संचालक व खरेदी संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी व्यक्त केले
नंदेश्वर येथे माळी कुटुंबातील तीन महिलांची दिनांक 21 रोजी हत्या करण्यात आले ही हत्या शेत जमिनीच्या बांधाच्या कारणावरून व पूर्व वैमन्याशातून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. माळी कुटुंबावर कोसळलेल्या दुःखातून त्यांना जगण्याचे बळ मिळावे या हेतूने सिद्धेश्वर अवताडे यांनी माळी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत त्यांना आधार दिला.मंगळवेढ्यासारख्या संतांच्या भूमीत अशी घटना घडणे दुर्दैवी असल्याचे अवताडे म्हणाले.
याप्रसंगी माजी सरपंच गेना दोलतडे,धनाजी गडदे, गणेश जोरवर-पाटील,महावीर लवटे, डॉ भैय्या मणेरी,पोलीस पाटील संजय गरंडे, दाजी गरंडे आदी उपस्थित होते.