लोकसहभागातून आंधळगावात ‘ती’ च्या शाळेसाठी सायकल बँक सुरु

सात सायकली शाळेकडे जमा

मंगळवेढा प्रतिनिधी

              जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या ‘सायकल बँक’ हा उपक्रम चळवळ बनत असून जिल्ह्यात अनेक गावामधून सायकल बँक निर्माण होऊ लागल्या आहे त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळा आंधळगाव येथे ही लोकसहभागातून सायकल बँक उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत लोकसभागातून सात सायकली जमा झाल्या होत्या. या बँकेतून गरीब- गरजू मुलींची निवड करुन शाळेत ये-जा करण्यासाठी सायकलीचे वाटप दि. 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले
याप्रसंगी विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय भाकरे, दिनकर भाकरे, धनश्री मल्टीस्टेटचे शाखाधिकारी बबन पाटील, ग्रामपंचायत सदस्य शंकर शिंदे, जितेंद्र लेंडवे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष भारत शिंदे, ग्रामसेवक करे, प्र.मुख्याध्यापक वि. दा. खांडेकर, शिवाजी डांगे, सादिक तांबोळी, सुखदेव नागणे, तनवीर मुलानी, पेंटर अरुण शिंदे, संजय स्वामी, दत्तात्रय शिंदे, दिगंबर नवले, चोखा उबाळे, माणिक नवले प्रवीण गांडुळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
           हा उपक्रम राबविण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने दोन सायकल, धनश्री मल्टीस्टेट मंगळवेढा शाखा आंधळगाव यांच्या वतीने दोन सायकल, शिवरत्न नागरी सहकारी पतसंस्था आंधळगाव यांच्या वतीने एक सायकल, पांडुरंग कृषी सेवा मित्रपरिवार यांच्यावतीने एक सायकल व ग्रामसेवक संघटना यांच्या वतीने एक सायकल अशा जमा झालेल्या सात सायकली जिल्हा परिषद शाळा आंधळगाव ला सुपूर्द करण्यात आल्या होत्या.
सोलापूर जिल्ह्यात सायकल बॅंक हा उपक्रम सीईओ स्वामी यांनी राबविला. माळशिरस तालुक्यातील निमगाव मधून सुरू झालेला हा उपक्रम पुढे जाऊन उपक्रम न राहता एक चळवळ बनली. कित्येक संस्था, दानशूर व्यक्ती, जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन मुलींसाठी सायकली भेट दिल्या आहेत. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर मुलींना दिलेल्या सायकली शाळेत जमा करण्यात येतील व पुढील शैक्षणिक वर्षात पुन्हा मुलींना देण्यात येतील असे या अभियानाचे स्वरूप आहे.
           हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बाळासाहेब भाकरे, शाबुद्दीन मुलानी, गजानन लिगाडे, समाधान वेळापुरे, भा.द. तानगावडे श्रीमती रा. का. बुगडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लिकार्जुन माळी यांनी केले तर आभार काकासाहेब चव्हाण यांनी मानले.

Comments (0)
Add Comment