मंगळवेढा शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अनिल मुदगूल व चंद्रकांत काकडे यांची निवड

मंगळवेढयातील शिवजन्मोत्सव सोहळा आदर्श

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी

मंगळवेढा शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अनिल मुदगूल व चंद्रकांत काकडे यांची निवड करण्यात आली आहे.
  दि.१५ जानेवारी रोजी येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सर्व पदाधिकारी व शिवप्रेमींची बैठक संपन्न झाली यावेळी अध्यक्ष पदासाठी आठ जण इच्छुक उभे राहिल्याने मोठा पेच निर्माण झाला मात्र मंडळाचे काही माजी अध्यक्ष व ज्येष्ठ लोकांनी यावर तोडगा काढत दोन अध्यक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात अध्यक्ष पदी अनिल मुदगूल व चंद्रकांत काकडे ही दोन नावे अध्यक्ष म्हणून काम पाहतील असा निर्णय देण्यात आला. सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढयाचा शिवजन्मोत्सव सोहळा एक आदर्श शिवजन्मोत्सव म्हणून ओळखला जातो.
          मात्र तो यावर्षी दोन अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक, शिस्तबद्ध आणि एकोप्याने साजरा करण्याचे ठरले.यावेळी नूतन अध्यक्ष अनिल मुदगूल व चंद्रकांत काकडे यांचा मंडळाच्या हस्ते तसेच आमदार आवताडे सम्पर्क कार्यालयात आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते तर सिद्धेश्वर आवताडे यांच्या सम्पर्क कार्यालयात खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. निवडीच्या वेळी शिरशी येथील महाराष्ट्र केसरी उपविजेता पैलवान महेंद्र गायकवाड यांच्या अभिनंदनाचा ठराव देखील एकमताने या बैठकीत संमत करण्यात आला.
               सदरप्रसंगी जेष्ठ रामभाऊ वाकडे, विष्णुपंत आवताडे, विठ्ठल घुले, विठ्ठल गायकवाड, मारुती वाकडे, दिलीप जाधव, पक्षनेते अजित जगताप ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, , प्रवीण खवतोडे, चंद्रकांत पडवळे, शरद हेंबाडे रामचंद्र दत्तू, मुरलीधर घुले, सचिन शिंदे, राजेंद्र चेळेकर, सुरेश कट्टे,गणेश सावंजी, हर्षद डोरले बाळासाहेब नागणे उद्योजक राहुल ताड, सोमनाथ माळी, सोमनाथ बुरजे, समाधान हेंबाडे भारत मुढे सत्यजित सुरवसे बाळासाहेब निकम, नितीन इंगळे,सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर कौंडुभैरी, प्रा.विनायक कलुबर्मे, राहुल वाकडे, राहुल सावंजी, उमेश आवताडे, संभाजी घुले, ज्ञानेश्वर कौंडुभैरी, पोपट पडवले, मुझमील काझी, बलवान वाकडे,परमेश्वर पाटील,संतोष रणदिवे, किशोर दत्तू, मधू मुरडे, बबलू सुतार, जमीर इनामदार, शरद गोसडे आदी उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment