मंगळवेढा प्रतिनिधी
लेंडवे चिंचाळे ता मंगळवेढा येथील मंगळवेढा ते सांगोला रोडवर चाळीस धोंडा नजीक हॉटेल ज्ञानेश्वरी लॉज बोर्डिगमध्ये पैसे घेवुन अवैध वेश्या व्यवसायावर मंगळवेढा पोलिसांनी छापा टाकून एका पिडीत मुलीसह आरोपी अविनाश विष्णू येडगे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की दि 14 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पो नि रणजित माने यांना लेंडवे चिंचाले हद्दीत चाळीस धोंडा येथे असलेल्या एका लॉज वर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली त्या अनुशंगाने वरिष्टांच्या परवाणगीने कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन
पोलीस ठाणेकडील अधिकारी अंमलदार व पंच,बनावट ग्राहक असे सरकारी वाहनाने लेंडवे चिंचाळे येथील ब्रिजच्या पुलाच्या खाली आडोशाला जावुन थांबले. व थोड्याच वेळात बनावट ग्राहकाचा संकेत मिळाल्याने सर्व महिला व पुरुष अधिकारी अंमलदार यांनी छापा टाकला असता एक पिडीत मुलगी, बनावट ग्राहक व लॉजचे मालक रंगेहात सापडले त्यावेळी त्याची झडती घेतली असता पोलीसांनी बनावट ग्राहकास दिलेले पैसे आरोपी अविनाथ विष्णु येडगे यांचे ताब्यात मिळुन आले असता पोलीसांनी आरोपी, पिडीत महिला, बनावट ग्राहक यांच्याकडे चौकशी केली असता हॉटेल ज्ञानेश्वरी लॉज येथे स्वताच्या अर्थिक फायद्यासाठी पिडीत महिलेची शरीरीक पिळवणुक करुन तिचे कडुन वेश्या व्यवसाय करुन घेवुन तिचे कमाईवर स्वताची उपजिवीका करताना मिळुन आल्याने अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक रणजीत माने मंगळवेढा ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, सोलापुर ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव,श्रीमती राजश्री पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने मंगळवेढा पोलीस ठाणे, सपोनि सत्यजित आवटे, पोसई सलिम शेख, पोसई अशोक बाबर, पुरुषोत्तम धापटे, सपोफौ अविनाश पाटील, पोहेकॉ हजरत पठाण, पोहेकॉ दत्ता येलपले, पोकॉ राजु आवटे, पोकॉ प्रविण सावंत, पोकॉ कदम, मपोना सुनिता चवरे, मपोकॉ अंजना आटपाडकर यांनी सदर गुन्ह्याचे तपास कामी मदत केली आहे.