मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती, उचेठाण, भोसे येथे भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या टोळीतील एका आरोपीस मंगळवेढा पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्याकडून 1लाख 70 हजाराचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील जमादार महबूब उंब्रजकर हे दि तीन ऑगस्ट 2022 रोजी राहत्या घराला कुलूप लावून हुलजंती येथे आठवडा बाजार आणण्यासाठी गेले होते दरम्यान बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक रणजीत सिंह माने यांनी पोलीस उपनिरीक्षक धापटे, पोहे का हेंबाडे, पोलीस नाईक येलपले, पो का मिसाळ ,मोरे यांची टीम करून चोरीच्या तपास कामासाठी लावली होती. तपासाअंती या टीमने आरोपी विजय छबू काळे( वय 23) रा.फोंडशिरस ता. माळशिरस याला घरफोडीच्या गुन्हया प्रकरणी अटक केली तसेच इतर चोरीच्या गुन्ह्याच्या तपास कामी आरोपिकडे अधिक चौकशी केली असता त्याने मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या उचेठाण व भोसे येथील चोरीची कबुली दिली. उचेठाण येथील मसा धोंडीबा साखरे व भोसे येथील शारदा उत्तम कोपे यांनी भर दिवसा त्यांच्या बंद घरातील कडी कोयंडा तोडून कपाटातील सोन्याचा ऐवज लंपास झाल्याची फिर्याद मंगळवेढा पोलीस ठाण्यात यापूर्वी दिलेली होती त्यानुसार आरोपी विजय काळे यांनी पोलीस तपासा दरम्यान हुलजंती, उचेठाण, भोसे येथील बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरातील कपाटातील सोन्याचे दागिने साथीदारांच्या मदतीने चोरून नेल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपिकडून अर्धा तोळ्याची बोरमाळ,चार ग्राम वजनाची ठुशी, 15 ग्रॅम वजनाच्या तीन पिळ्याच्या अंगठ्या, 15 ग्रॅम वजनाचे झुबे, डोरले, असा सुमारे 1लाख 70 हजाराचा सोन्याचा ऐवज जप्त केला आहे
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे, पोहेकॉ दयानंद हेंबाडे, दत्ता येल्पले पोकॉ सुनील मोरे ,अजित मिसाळ यांनी केली आहे