मंगळवेढ्यात स्वस्तातल्या सोन्याचा मोह पडला महागात

4लाख 55 हजाराचा ऐवजाची लूट

मंगळवेढा  प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे रस्त्यावर स्वस्तात सोने देतो म्हणूनआरोपी सुरेश उर्फ बिगुल्या काळे( रा- सिध्दापुर ता मंगळवेढा )व अनोळखी 3 इसम यांनी दोघांना लाथाबुक्याने जबर मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल असा 4लाख 55 हजाराचा ऐवज लुटून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे

याबाबत शेटीबा गौतम जाधव वय-32 वर्षे रा-किलारी ता-औसा जि-लातूर यांनी फिर्याद दिली आहे
याबाबत अधिक माहिती अशी
दिनांक 13डिसेंम्बर 22 रोजी सकाळी 11:45 वा. चे सुमारास बोराळे गावचे हद्दीतील मंगळवेढा ते बोराळे जाणारे रोडचे आत मध्ये अर्धा किमी अंतरावर कॅनॉल पट्टीवर यातील आरोपी सुरेश उर्फ बिगुल्या काळे व अनोळखी 3 इसम यांनी फिर्यादीस तुम्हाला मी कमी पैश्यामध्ये सोने देतो असे म्हणुन फिर्यादीस व त्यांचे भावजी यांना बोलावुन घेतले

त्यावेळी आरोपीने फिर्यादीस लाथाबुक्याने जबर मारहाण करून फिर्यादीचे खिशातुन 4लाख 48 हजार रोख रक्कम तसेच भावजी अरूण गायकवाड यांचा सात हजार किमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल बळजबरीने काढून घेतला व तुम्ही ही गोष्ट कोणाला सांगितले तर तुम्हास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देऊन आरोपी दोन मोटार सायकलवरून निघुन गेल्याची फिर्याद शेटीबा जाधव यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे पुढील तपास सपोनि वाघमोडे करीत आहेत

Comments (0)
Add Comment