मंगवेढ्यातील जय भवानी सोसायटीत असुविधामुळे नागरिकांची अवस्था ना घर का ना घाट का

 

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी : मंगळवेढा शहरातील जयभवानी सोसायटी मध्ये चार ते पाच हजार लोकवस्तीअसताना मतदान नगरपालिकेला मात्र सोयीसुविधा देताना मात्र ना घर का घाट अशी अवस्था झाली असून या नागरिकांच्या समस्येकडे नगरपालिका, ग्रामपंचायत व हद्दीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत येत नसल्याचे सांगत येथील नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे आम्हाला कर्नाटक राज्यामध्ये समाविष्ट करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी चंद्रकात पवार यांनी केली असून काही राजकीय हेतूने काहीजण या लोकवस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे

 

मंगळवेढा शहरानजीक जय भवानी हाउसिंग सोसायटीमध्ये सर्व समाजातील व गोरगरीब,शेतमजूर, असंघटित कामगार वास्तव्यात आहेत. त्या जय भवानी हाऊसिंग सोसायटी ही नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीमध्ये नसल्यामुळे त्या ठिकाणी आजही चालण्यासाठी रस्ते नाहीत, सांडपाण्यासाठी गटारे नाहीत, घनकचरा व्यवस्थापन, शौचालय, रस्त्यावरील दिवे अशी नागरिक सेवा सुविधा मिळत नाही.त्या लोकवस्तीत नवजात बालाकाचा जन्म झाला किंवा कोणाचा मूत्यू झाला तर नोंद सुध्दा होत नाही. ह्या लोकवस्तीत सेवा सुविधा, शासकीय योजना मिळणे लांबच राहते त्यामुळे सामूहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता त्यावेळी दि २३ नोंव्हेंबर ला बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती मात्र काही राजकीय पुढार्यांच्या सांगण्यावरून बैठक रद्द करण्यात आली त्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबाची दयनीय अवस्था झालेली आहे. त्यामुळे जय भवानी हाऊसिंग सोसायटी नगरपालिका हद्दीत व ग्रामपंचायत हद्दीत नसल्यामुळे त्या ठिकाणी विकास कामे होत नाहीत. म्हणुन मंगवेढ्यातील जय भवानी सोसायटीच्या नागरिकांची आज दि 28 रोजी एकत्र येत कनार्टक राज्यात जाण्यासाठी घोषणा दिल्या.

त्यावेळी आदित्य हिंदुस्तानी, प्रकाश नलावडे, दशरथ देवकर,सतिश मुदगुल,संतोष शिंदे, लखन पवार, दांडेकर

लक्ष्मण दांडेकर,राहुल देवकर,राहुल पवार,अंकुश पवार,निखिल देवकर,मधु देवकर,रोहित पवार,दत्ता जाधव,दत्ता पवार,राहुल पवार,दत्ता धोत्रे,दिगंबर धोत्रे,रवी जाधव,अनिल पवार,पप्पू पवार,दादा पवार,सागर पवार,युवराज पवार,प्रथमेश पवार आदी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments (0)
Add Comment