मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुका पंचायत समिति गुण नियंत्रण तथा कृषि अधिकारी विनायक तवटे यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभारला कंटाळून खते,औषधे बी-बियाणे दुकानदारानी बेमुदत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचे निवेदन मंगळवारी मंगळवेढा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांना दिले आहे.
मंगळवेढा तालुका रासायनिक खते, बी-बियाणे, औषधे विक्रेते संघटनेच्या सदस्यांनी दिलेल्या निवेदनात ,मंगळवेढा तालुका पंचायत समिति अंतर्गत जो गुण नियंत्रण (कृषि) विभाग येतो त्या गुणवत्ता नियंत्रण अधिकारी विनायक तवटे यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभारला कंटाळून सर्व कृषि निविष्ठा विक्री केंद्रे बेमुदत बंद करण्याचा निश्चय केला असून गुणवत्ता नियंत्रण अधिकारी विनायक तवटे हे कृषि दुकानदारांना व संबंधित कंपन्यांना खते, बी-बियाणे ,किटकनाशके यांचा नमूना तपासणीच्या नावाखाली कायद्याचा धाक दाखवून आर्थिक व मानसिक पिळवणूक करीत आहेत. राज्यातील विक्रेता कोणत्याही प्रकारच्या कृषी निविष्टा उत्पादित करीत नाही. सर्व विक्रेते राज्याच्या कृषी विभागाच्या मान्यता प्राप्त कंपन्याकडून बियाणे, खते, व कीटकनाशके सिलबंद पॅकिंग मध्ये खरेदी करून सिलबंद पॅकिंग मध्येच शेतकऱ्यांस विक्री करतात. राज्य शासनाच्या सुधारित नव्या जुन्या कायद्याचा धाक दाखवून दुकानदारांना व कंपन्यांना ब्लॅकमेल करून आर्थिक मागणी केली जाते, ती पूर्ण नाही केली की गुन्हे दाखल करू असे धमकावले जाते. अशा त्रासाला कंटाळून तालुक्यातील सर्व कृषि विक्रेत्यानी दुकाने बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर अधिकाऱ्याची एक तर बदली करावी अन्यथा कार्यभार काढून दुसऱ्या कर्तव्यनिष्ट व प्रामाणिक आधिकाऱ्याला द्यावा.शेतकरी अडचणीत असताना उधारीवर माल देणारा कृषि व्यावसायिक हा एकमेव व्यक्ति आहे. अगदी तळागाळापर्यंत काम करणारा शेतकरी पुत्र दुकानदार आहे, प्रामाणिकपणे शासनाच्या-कृषि विभागाच्या नियमावलीस अधीन राहूनच तो आपल्या मालाची विक्री करतो, तो कधीच कोणत्या शेतकऱ्याचे वाईट चिंतत नाही,संबंधित दुकानदार चुकत असेल तर त्याला योग्य ते मार्गदर्शन व कारवाई करण्याचे काम कृषि अधिकाऱ्याचे असताना पदाचा गैरवापर करीत असून त्याचा नाहक त्रास दुकानदार सहन करीत आहेत.तरी अधिकाऱ्याचा अधिकाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा हे मुदत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतल्याचे म्हटले आहे, यावेळी मंगळवेढा तालुका रासायनिक खते बी बियाणे कीटनाशक विक्रेते संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सावंत सचिव येताळा भगत, चंद्रशेखर कोंडूभैरी नंदू मोहिते मारुती जाधव,अशोक लोहकरे, धनाजी बिचुकले दादा शिंदे, वेताळा मुरडे संजय कट्टे , प्रदीप खांडेकर, विशाल खटकाळे, ढगे,विजय भोसले , समाधान घुले आदी उपस्थित होते.